Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन


लोकनेता  न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहिल्यानगर- अ.नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले (वय ६५) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शिवाजीराव कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले असून, कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या निधनामुळे राहुरी, नगर आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या