Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावमध्ये वाहतुकीचा उडाला पुरता बोजवारा..!


लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

     
शेवगाव : मढी व पैठण यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात सर्वच मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून गेल्या तीन तासापासून शेवगावमध्ये ट्रॅफिक जाम आहे.प्रचंड उकाडा व ट्रॅफिक जाममुळे नागरिक तसेच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र,वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस कुठेही दिसत नाहीत. गजबजलेल्या शेवगाव एसटी स्टँड चौकात झिरो पोलीस वाहतुकीचे नियमन करत आहे.



     दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव रविवार दि. 31 मार्च पासून सुरू झाला आहे.तर,भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव होळीपासून सुरू आहे.शनिवारी रंगपंचमी साजरी केल्यानंतर भाविकांची रीघ पैठणच्या नाथांच्या दर्शनासाठी लागली आहे.

     पश्चिम महाराष्ट्रातील भाविक शेवगाव मार्गे पैठणला जातात. मात्र,वाहतूक कोंडीमुळे गेल्या तीन तासापासून हे भाविक शेवगावमध्ये अडकले आहेत. त्यातच आज शेवगावचा आठवडी बाजार असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
 नेवासा,मिरी,नगर,पैठण व गेवराई या प्रमुख मार्गावर सध्या वाहतुकीची कोंडी आहे. वाहनांच्या सर्वच रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी असलेले वाहतूक पोलीस मात्र कुठेही दिसत नाही. शेवगावच्या गजबजलेल्या एसटी स्टँड चौकात झिरो पोलीस वाहतुकीचे नियमन करत आहे.

   दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील रामराज्य प्रत्यक्षात आले असल्याच्या वल्गना एकीकडे केल्या जात आहेत तर, दुसरीकडे शेवगावचे वाहतूक पोलीस नगर व पैठण रस्त्यावर नाथ भक्तांची भगवे ध्वज असलेली वाहने अडवून आर्थिक लुट करीत असल्याची तक्रार येथील हिंदूधर्मीय नागरिकांनी केली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या बाबतही वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या