झूक गया साला..! अखेर.. माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द
इतिहासप्रेमींचा फटाके फोडत एकच जल्लोष.. निर्णयाचे शहरवासियांकडून स्वागत..
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर- अहिल्यानगर(अहमदनगर) शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता व स्वाभिमान असणारी माळीवाडा वेस पाडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर तमाम शहरप्रेमींंच्या रेटयापुढे महापालिकेन मान तुकविली असून प्रशासनाला या निर्णयापासून माघार घ्यावी लागली आहे. तमाम नगरकरांच्या तीव्र भावन आणि वाढता रोष पाहून झूक गया साला..! अशीच काहीशी अवस्था मनपा प्रशासनाची झाली आहे. जनसामान्यांच्या रेटयापुढे मनपा प्रशाससनाने माघार घेत हा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयानंतर तमाम इतिहासप्रेमींनी फटाके फोडत एकच जल्लोष केला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या नावाखाली शहराची ऐतिहासिक वारसा असलेली माळीवाडा वेस पाडणयाचा निर्णय महापालिकेने जाहीर केला होता. या निर्णयाविरोधात तमाम इतिहास प्रेमी नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. या संदर्भात रसीक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, युवा नेते नीतीन भुतारे यांच्यासह तमाम इतिहास व सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्जांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शनिवारी माळीवाडा येथे एकत्र येत जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करीत शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. खा. निलेश लंके यांनीही ही वेस पाडणे म्हणजे केवळ अनुचित नव्हे तर इतिहास आणि सांस्कृतिक ओळख पुसरण्याचा प्रकार असल्याचा तिखट प्रहार करत या निर्णयाला विरोध केला होता. तसेच शहरातील अनेक इतिहासप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे वेस पाडण्याचा निर्णय रद्द करण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय राहिला नाही.

0 टिप्पण्या