Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावच्या कल्पना गोसावींच्या पंखांना बळ..!

 G- 18 ग्रुप पुणे तर्फे शिलाई व पिकोफॉल मशीनची भेट

   




   



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : गेल्या महिन्यात २३ मे ला शेवगावच्या कल्पना गोसावी यांच्या श्री फॅशन डिझायनर व ब्युटी पार्लर फर्मला आग लागून शिलाई व पिकोफॉल मशीन तसेच फर्निचर,ग्राहकांच्या साड्या व ब्लाऊज जळून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले . त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. संसार उघड्यावर आला. परंतु,त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी समाज बांधव एकवटले आणि मदतीचा ओघ सुरू झाला.



        या संदर्भातील वृत्त काही दैनिकात तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर गोसावी समाजातील अनेकांचे हात मदतीसाठी पुढे आले. सुमारे साडे पंचेचाळीस हजार रुपये थेट त्यांचे बँक खात्यावर जमा झाले. महाराष्ट्रातून पुणे येथे नोकरी - धंद्यानिमित्त एकत्र आलेल्या जी - १८ या ग्रुपने सौ. कल्पना गोसावी यांना मदतीचा हात पुढे करून साडे एकवीस हजार रुपये किमतीचे नवीन शिलाई व पिकोफॉल मशीन भेट दिले. पुणे (खडकी) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

     

याप्रसंगी जी -१८ ग्रुपचे सदस्य सर्वश्री जगन्नाथ भारती,  श्रीकृष्ण गिरी, रजनीकांत गोसावी, राम गोसावी, हिरागीर गोसावी, जयराज गोसावी,कैलास गिरी, सुभाष गिरी, डॉ.संतोष गोसावी, डॉ.अमृत गोसावी,डॉ. विद्याधर गोसावी, उत्तम पुरी,डॉ. अनिल गोसावी, डॉ.पंडित पुरी प्रवीण पुरी, सुभाष गोसावी, संदेश गोसावी, सुनील गिरी, सुरेश गोसावी तसेच कल्पना गोसावी, संगीता गिरी, जगन्नाथ गोसावी, संदीप गोसावी, अनिल गोसावी, मीनाक्षी गोसावी, सुमित्रा गोसावी, रेवती गोसावी, कमलेश्वर गिरी अनिकेत गोसावी आदी उपस्थित होते.


    *समाज बांधवाप्रती कृतज्ञता*

       मला नव्याने उभे राहण्यासाठी गोसावी समाज बांधवांनी आर्थिक मदत करून माझ्या पंखांना बळ दिले तसेच जी - 18 ग्रुप पुणे यांनी शिलाई व पिको फॉल मशीन उपलब्ध करून दिल्याने कुटुंबाच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटला आहे ,त्यामुळे मी सर्वांप्रति कृतज्ञता .  सर्वांचे मःपूर्वक आभार..!

 - कल्पना अनिल गोसावी

Mob.9503516521

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या