Ticker

6/Breaking/ticker-posts

'शब्दगंध'ची रविवारी महत्वपूर्ण बैठक

 

पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनासह विविध विषयांवर चर्चा                            


                        

                                                 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क                                      

नगर - येथील शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य संस्थेची महत्वपूर्ण बैठक रविवार दि.०२/०७/२०२३ रोजी सकाळी ११.३० वा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती शब्दगंधचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी दिली.         

                   

  शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत असून लवकरच पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ही महत्त्वपूर्ण सभा कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करणे,संमेलनासाठी निधी संकलन करणे, विविध विषय समित्या स्थापन करणे , परीक्षण समितीने निवड केलेल्या साहित्य कृतीस मान्यता देणे, पुरस्कारप्राप्त व नैपुण्यधारक साहित्यिकांचे अभिनंदन करणे, विविध पुरस्कारासाठी प्रायोजक शोधणे, पंधरावे शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

      तरी या  बैठकीस साहित्य व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी मंडळातील  ज्ञानदेव पांडूळे, प्रा. डॉ. अशोक कानडे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राजेंद्र फंड, राजेंद्र पवार, अजयकुमार पवार, डॉ. तुकाराम गोंदकर, किशोर डोंगरे, स्वाती ठुबे, बबनराव गिरी, शर्मिला गोसावी बीड जिल्हा समन्वयक सिराज शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिभाऊ नजन, पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ. अनिल पानखडे, नेवासा तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष लेविन भोसले, कोपरगाव तालुकाध्यक्ष कैलास साळगट, राहुरीच्या कार्याध्यक्ष जयश्री झरेकर,आष्टीचे बाळासाहेब शेंदुरकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या