Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा रुग्णालयात ५० खाटाचे क्रिटिकल हॉस्पिटल व लॅबला मंजुरी - खा.डॉ.सुजय विखे पाटील

  रुग्णांच्या सेवेत या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणारलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर   : प्रधानमंत्री आयुष्मान भारत मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा रुग्णालयास 50 खाटाचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल व इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब  मंजूर झाले असून रुग्णांच्या सेवेत या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 


 खा. विखे पा. पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअं तर्गत  ५० खाटाच्या सिसीएचसाठी २३ कोटी ७५ लाख रुपये तर सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी आयपिएचएल  लॅबसाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णांचा विचार करता 50 खाटाचे सीसीएच हे युनिट लवकरच सुरू होत असून याचबरोबर दुर्धर आजाराचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या विविध रक्त तपासणीसाठी अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात येणार आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत ज्या पद्धतीने देश संकटाला सामोरे गेला तशीच परिस्थिती पुन्हा आली तर जिल्हास्तरावर सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता जिल्हा रुग्णालयात सिसीएच आणि आयपीएचएल सेवा सुरू केली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध व्हावी या करिता सातत्याने  पाठपुरावा करून  योजना आणली असल्याचे यावेळी खा.विखे पाटील यांनी सांगितले.   लवकरच हे दोन्हींचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या