केदारेश्वरचा गळीत हंगाम सुरू
लोकनेता न्यूज
शेवगाव :- सहकारी संस्थांमध्ये शिस्तीला फार महत्त्व असून, साखर कारखान्यांनी काळाची पावले ओळखून वाटचाल करावी. केवळ पारंपरिक ऊस गाळपावर मर्यादित न राहता उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केले.
संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखानान्या च्या गळीत हंगामाचा प्रारंभ राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव काका ढाकणे होते. यावेळी व्हा चेअरमन डॉ. प्रकाश घनवट,
तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, प्रभावती ढाकणे,सर्व संचालक मंडळ ,कर्मचारी वर्ग, शेवगाव पाथर्डी व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले,
शेवगाव-पाथर्डी मतदार संघात माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आदरणीय बबनराव ढाकणे यांनी बोधेगाव मध्ये उजाड माळरानावर कारखानाच्या रुपात एक काम धेनूचे रोपटे लावले त्या रोपट्याचा आज एक मोठा वटवृक्ष झाला झालेला आज आपण पाहत आहेत साहेबांची असलेली दुरदृष्ट््यी या निमित्ताने नक्कीच दिसून येत आहे. असे सांगितले.
आज अनेक संकटावर मात करत ॲड. प्रताप काका ढाकणे ,त्याचबरोबर सौ. प्रभावती काकी ढाकणे, ऋषिकेश दादा ढाकणे,या ढाकणे कुटूंबानी बबनराव ढाकणे यांचा वारसा चालविला आहे. या कारखान्यासाठी आपल्या जीवाचे रान केले आहे या कारखान्यावर विशेष म्हणजे शेवगाव आणि पाथर्डी भागातील शेतकरी, गोरगरीब,कस्टकरी,आपले पोट भरवित आहेत आणि आपला संसार सुखाचा करत आहेत .
कोणताही बडेजाव व मोठेपणा अंगी न बाळगता काका सर्व सामन्य व्यक्तीना भेटतात, त्यांचा आलेला फोन घेतात . त्याची अडचण ऐकून घेऊन सोडवतात व त्याला धीर देतात हेच तर काकांचे मोठेपण आहे.
आज कारखाना सुरू राहीला म्हणजे आजूबाजूच्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर बोधेगाव बाजार पेठेत मोठी उलाढाल होते
प्रास्ताविक भाषणात ॲड. ढाकणे यांनी कारखान्याचा आढावा घेऊन आगामी काळात दोन्ही तालुक्यातील सर्व सामान्य व शेतकऱ्यांसाठी केदारेश्वर भक्कम आधार ठरेल, अशी ग्वाही दिली.
0 टिप्पण्या