Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपा-राष्ट्रवादीचा धमाका..! 5 जण बिनविरोध..

महानगरपालिकेच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 194 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.आता 17 प्रभागामध्ये 283 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहिल्यानगर- महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती आहे. तर शिवसेना ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे 2 तर अखेरच्या दिवशी भाजपचे 3 असें युतीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पा अनिल बोरुडे, तर प्रभाग क्रमांक सहा मधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अशी माहिती विविध प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 194 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता 17 प्रभागामध्ये 283 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.  63 जागासाठी आता तिरंगी सामना रंगणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या