Ticker

6/Breaking/ticker-posts

क्रांतिकारी समाजसुधारक ः वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ



 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

१९ व्या शतकाच्या उदयाला महाराष्ट्रात दोन महान विभूतीं मानवी रूपात अवतरल्या. एक म्हणजे साक्षात वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ आणि दुसरे होते, शांतीब‘म्ह संत भगवानबाबा. योगायोग म्हणजे हे दोन्ही हरिचे दास जन्मले ते कूळ होते वंजारी. ज्या समाजाला ना इतिहास ना भूगोल. कोठून आला, कोठे चालला माहित नाही. कायम भटका, डोंगर-दर्‍याखोर्‍यांमध्ये वास्तव्य.. त्यामुळे अनेक अंधश्रध्दा,अनिष्ठ रूढी,परंपरांनी पिंजून गेलेला मराठवाडयातील हा भाग या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला.

संत वामनभाऊंचा जन्म बीड जिल्ह्यातील ङ्गुलसांगवी या गावी १ जानेवारी इ.स. १८९१ ला माता राहिबाई व पिता तोलाजी सोनवणे या वारकरी दांम्पत्यांच्या पोटी झाला. जन्मबरोबरच आईच्या मायेला मुकलेलं हे बाळ आजीच्या सहवासात वाढू लागलं. सवंगडयांबरोबर भजन,किर्तन व दिंडयांचा खेळ खेळू लागलं. जन्मतःच भाऊंचा पिंड हा वारकरी होता, याचा हा प्रत्यय. प्राथमिक शिक्षणाची पायरी चढली अन् त्यानंतर मार्ग सापडला तो थेट ज्ञानीयांचा राजा असलेले संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आळंदीचा. अध्यात्मिक शिक्षणासाठी भाऊ  आळंदीत दाखल झाले. (येथेच भाऊ व भगवानबाबांची पहिली भेट झाली.) एक तपाचे शिक्षण पूर्ण करून भाऊंनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी निवड केली ती गहिनीनाथ महाराजांचे संजीवन समाधीस्थान असलेले क्षेत्र करणकगिरी क्षेत्राची. हे वारकरी संप्रदायाचे मुळ असल्यामुळेच भाऊंनी हे ठिकाण निवडले असावे. 

देशात एकीकडे इंग‘जी राजवट तर मराठवाडयात जुलमी रझाकारांची दडपशाही असा भीषण संकटाचा तो काळ होता. बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये नाथ संप्रदायाचे वास्तव्य राहिले आहे. चिंचोली येथे नवनाथांपैकी एक असलेले गहिनीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. हा परिसर अत्यंत दूर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा होता. नाथांची त्यांच्या पुजार्‍यांना दान मिळालेली बारा भिगा जमीन या ठिकाणी होती. परंतु त्यावर रझाकारांची हुकूमत हेाती. भाऊंनी त्या विरोधात आष्टी कोर्टात काही काळ न्यायालयीन लढा दिल्याची नोंद आहे.  या लढाईत गहिनीनाथांची समाधी सर्व समाजासाठी मुक्त करण्याची पहिली कामगिरी भाऊंनी केली. ही समाधी सद्याच्या गहिनीनाथ गडापासून अंदाजे २ कि.मी. वर आहे. गहिनीनाथांना गुरूस्थानी मानून भाऊंनी चिंचोली येथे भव्य दगडी गडाची उभारणी केली. येथे विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती व नाथांचे समाधी मंदिर बांधून वारकर्‍यांसाठी हक्काचे धर्मपीठ निर्माण केले. येथूनच गहिनीनाथगड ते पंढरपूर आषाढी,कार्तिकी वारीला दिंडी तसेच आळंदी दिंडी सुरू केली. दिंडीची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. त्याचबरोबर नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला, आज जवळपास पाऊणशे वर्षे झाली,गावोगाव बदलत्या क‘माने नारळी सप्ताह अविरत सुरू आहेत. या गडाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा लाभला आहे. संत वामनभाऊ हे नांव उच्चारल्याबरोबर लाखो भक्तांना एक रोमांचकारी प्रेरणा मिळते. बलदंड शरीरयष्टी,पहाडी आवाज,पांढरा शुभ‘ पेहराव,कपाळी अष्टगंध, गळयात तुळशीची माळ आणि मुखी रामकृष्णहरी हा अमोघ मंत्र असे भाऊंचे सर्वव्यापी व्यक्तिमत्व होते. हे 


महाराष्ट्रातील एक प्रसिध्द मराठी संत आणि किर्तनकार होते. संत वामनभाऊ हे एक अवतारी सिध्दपुरूष,साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोाकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले.

. त्यांचा दृष्टिकोन समाजसुधारकाचा होता.  त्यामुळे नर-नारी समान, जात,पात,धर्म पंथ असा कोणताही भेदभाव त्यांनी केला नाही. वंजारी समाजाबरोबरच इतर अठरापगड जाती धर्मामध्ये त्यांचा मोठा भक्त परीवार आहे.  बालब‘म्हचारी असलेल्या भाऊंनी शुद्ध शाकाहार, एकादशी व‘त, अहिंसा आदी तत्त्वांचा पुरस्कार करून वारकरी सांप्रदायाचा महिमा आपल्या कीर्तनातून सांगितला. त्यांची शिकवण ज्यांनी तंतोतंत आचरणात आणली असे ह.भ.प. नारायण महाराज व ह.भ.प.खंडोजी बाबा आज संतपदाला पोहोचले. प्रत्येकाने या तत्वांचा अंगीकार  करावा  व जीवनाचं सार्थक करावं असा त्यांचा उपदेश असे. अनेक वेळा गावो-गाव होणार्‍या किर्तनाला तसेच दिंडयांमध्ये सहभागी होण्यासाठी ते सर्वसामान्यांना स्वतः आवाहन करत.  परंतु काही जण सुरूवातीस त्यांचं म्हणंण मानत नसत, काही तरी कारणं सांगून टाळण्याचा प्रयत्न करीत असत, अशा वेळी भाऊ तू म्हणशील तसेच होवो, असे म्हणाले की, त्या भक्तांना भाऊंच्या बोलण्याचा प्रत्यय येई. भाऊंना वाचासिध्द प्राप्त होती, ते बोलत तसेच घडत असे. हे वास्तव असून आजही हयात असलेले असं‘य भक्त भाऊंच्या वाचासिध्दीचा अनुभव  कथन करतात, यामागे कोणताही स्वार्थ नसे तर संसाररूपी मोहमायेत गुरङ्गटलेल्या समाजाला अध्यात्माच्या,विकासाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश असे. स्वभाव रागीट होता परंतु ह्दयात मायेचा अथांग सागरही होता. कारण त्यांना असत्य आजिबात पटत नसे. एखाद्यावर रागावले तरी दुसर्‍याच क्षणी त्याची आस्थेनं विचारपूस करीत. ब‘महचर्य व‘त जोपासतांना  स्त्रीला त्यांनी मातेसमान मानले. स्त्रीयांना अंतरावरूनच दर्शन देत. कारण समाजातील अपप्रवृत्तींनी स्त्रीयांच्या माध्यमातून  अनेक संत,महंत आणि योग्यांवर बालंट आणल्याचा  इतिहास त्यांना ज्ञात असावा. 

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, गुजरात, आंधप्रदेश आदी राज्यांमध्ये हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संत महिमा व भागवत धर्माचा प्रचार, प्रसार केला. त्यांचे जीवन निष्कलंक, अत्यंत कोटेकोर व शिस्तबध्द होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी होणार्‍या पशुहत्या बंद केल्या. अनिष्ठ रूढी-परंपरांवर कोरडे ओढले. शिक्षणाचे महत्त्व किर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले. भरकटलेल्यांना भक्मिमार्गाला लावले. हरीनाम सप्ताहांद्वारे अन्नदान,परोपकार,परस्परांतील आदरभाव वाढीस लावला. त्यांच्यावर संत ज्ञानेश्‍वर,संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर आचारणात नाथांचे वैराग्य, आणि वाणीत सिध्दता होती. पंढरपूरची वारी नियमित करून भक्तीमार्गाचा महिमा अखंड समाजाला पटवून दिले. किंबहूना माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे काम खर्‍या अर्थाने त्यांनी केले. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. कृष्ण पक्षातील वद्य अष्टमी म्हणजेच २४ जानेवारी १९७६ साली भाऊंनी देह ठेवला. मात्र त्यांचे हे कार्य संपूर्ण मानवजातीला दीपस्तंभाप्रमाणे सन्मार्ग दाखिवत आहे. त्यांचा शिष्यगण,त्यांनी घडविलेले अनेक किर्तनकार,टाळकरी,वारकरी गहिनीनाथ गड येथें या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. पुण्यतिथीला राज्यभरातून लाखोंच्या सं‘यने भाविक भाऊंच्या समाधीदर्शनासाठी गहिनीनाथ गडावर येतात. आणि त्यांच्या विचाराचं सोनं आपल्या घरी घेऊन जातात. 

संत वामनभाऊ व भगवानबाबांची पहिली भेट आळंदीत झाली. दोघांचेही गुरू एकच असल्यामुळे ते गुरूबंधू म्हणून परिचित झाले. वामनभाऊ बाबांपेक्षा ५ वर्षाने मोठे होते, भाऊ हे बाबांपेक्षा वयाने मोठे असल्याने बाबांनीच त्यांना भाऊ ही उपाधी दिली. सलग १२ वर्षे दोघे एकत्र राहिले शिकले आणि अध्यात्मिक कार्यातही एकमेकांना शेवटपर्यंत साथ  दिली. दोघांचे कार्य करण्याचे ठिकाण भले वेगळे असले तरी मार्ग हा एकच होता. तो म्हणजे भागवत धर्माचा प्रचार,प्रसार आणि समस्त मानव जातीचे कल्याण. विचारांचा हा समान धागा असल्यामुळे तुझं-माझं नाही तर आपलं ही अहंकारविरहीत भावना होती,ती प्रारंभीपासून शेवटपर्यंत जपली. सद्या अध्यात्माच्या क्षेत्रात जे हेवे-दावे सुरू आहेत ते पाहून भक्तगणांना या महात्म्यांच्या परस्परांवरील आदरभावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी साठी भाऊ -बाबांच्या विचांराचे अनुकरण करण्याची नितांत गरज आहे. भाऊ-बाबांचं कार्य आजही तेवढंच प्रेरणादायी आहे, यापुढेही राहील, त्यांना त्रिवार वंदन...

     - पोपट सांगळे 

                                                                मा.उपाध्यक्ष,अ.नगर प्रेस क्लब (९४ २२ २२ ५००१)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या