Ticker

6/Breaking/ticker-posts

कै.सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


मुंबई :-दिनांक 07 ऑक्टोबर 2022

 कै.सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयास *Asian Today Research and Media* या राष्ट्रिय स्तरावरील संस्थेतर्फे *Nation Pride Awards 2022* अंतर्गत *Best Polytechnic College in Maharashtra* या पुरस्काराने. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.


पुरस्कारचा संस्थेचे अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे आणि सचिव जयवंता राहणे यांनी   स्विकारकेला.

मौजे राक्षी ता. शेवगाव येथील कै.सौ.सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयास 'एशियन टुडे रिसर्च अॅण्ड मिडीया', नवी दिल्ली या जागतिक दर्जाच्या संस्थेमार्फत ग्रामीण भागात सामाजिक-आर्थिक विकासकासाठी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय स्तरावर पहिल्या ५० संस्थांसाठी दिले जाणारे 'बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज इन महाराष्ट्र' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,यांनी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजता हॉटेल ट्रायडेन्ट, मुंबई येथे 'एज्युकेशन प्राईड समिट अॅण्ड अवार्ड २०२२' अंतर्गत ह्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याबद्दल ढाकणे तंत्रनिकेतनचे पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संस्थेस यापूर्वीही २०१२ साली नवी दिल्ली येथे शिक्षा भारती व २०१५ साली नॅशनल एक्सलन्स अवार्ड या पुरस्काराने  सन्मानीत करण्यात आले होते. संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरातून घेतले जात असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना करून अतिशय प्रतिकुल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या तासिका आणि प्रात्यक्षिक ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या