Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख यांच्या हस्ते डॉ. विखे पाटील कॅन्सर सेंटरचे उद्या लोकार्पण




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर. दि.१९ - डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विळद घाट, अहमदनगर येथील कर्करोग (कॅन्सर) विभागाचे व नूक्लियर मेडिसिन विभातील पेट-सिटी स्कॅनचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते गुरुवार, दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी स. ११ वाजता, होत आल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.


या कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे.


या कार्यक्रमास, वैद्यकीय शिक्षण तथा ग्राम विकास मंत्री  नामदार  गिरीश महाजन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार श्तान्हाजी सावंत, तसेच संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार  राधाकृष्णविखे पाटील, तसेच आजी माजी आमदार, खासदार व पदाधिकारी यांच्या उपस्थित होणार आहे. असेही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या