Ticker

6/Breaking/ticker-posts

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकृरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या ; अॕड. प्रतापराव ढाकणे यांची मागणी

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क


पाथडीॕ- मागील आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने शेवगाव व पाथडीॕ तालुक्यात मोठा धूमाकुळ घातला असून हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके जवळपास पूर्णतः वाया गेली असून शासनाने अतिवृष्टीग्रस्त बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केली.

   महाविकास आघाडीच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून दोन्ही तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला.त्यामुळे खरीप हंगामातील कापूस,तूर,सोयाबीन,मूग,उदीड व  बाजरी या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक शेतातील पिके पावसाने  झोडपली गेली आहेत किंवा अधिकच्या पाण्याने सडून गेली आहेत.ऐन सणासूदीच्या दिवसांत ही पिके शेतकऱ्यांनसाठी आथिॕक हातभार लावणारी होती मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.तसेच दोन्ही तालुक्यातील अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही मदतीची गरज आहे.यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी प्रचंड नुकसानदायक ठरला असून बाधित पिके व फळबागांचे तात्काळ पंचनामे नियम शिथिल करून करावे व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रूपयांचे अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी असे अॕड.ढाकणे शेवटी म्हणाले.

निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,शहराध्यक्ष योगेशा रासने,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमूख भगवान दराडे,देवा पवार,आतिष निर्हाळी,चंद्रकांत भापकर,सचिन नागापुरे,जुने पठाण इदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या