Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये ओणम उत्साहात संपन्न

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर-आज भारतामध्ये 'ओणमहा साजरा केला जात आहे. केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते. त्यामुळे आज केरळी लोकं हा सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात. नगरमध्येही सर्वानी हा उत्सव साजरा केला असून नगर शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांची असंख्य घरे आहेतयेथील उद्योजक सत्यम यांच्या सावेडी येथील घरी आज ओणम साजरा करण्यात आला.                   दिवाळी सारखा हा सन असून वामन अवतारातील बळीराजा , महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. पातळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी या दहा दिवस पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागतसाठी घराच्या पुढे फुलाच्या रांगोळ्या काढल्या जातात.  ओनमच्या सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस असतो हनुमान तिरु ओनम या दिवशी मल्याळी नागरिक घराच्या समोर फुलांची रांगोळी  काढतात त्याला याला पुककलम म्हणतात.  यादिवशी इतर समाजाचे नागरीक शुभेच्छा देण्यासाठी केरळी बांधवांच्या घरी  येतात.

                          

ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे.ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याचं पूजन मोठ्या उत्साहात केलं जातं.दक्षिण भारतामधील केरळ मध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे. तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात १० दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला 'अथमआणि शेवटच्या दिवसाला 'थिरुओणम' असे म्हटले जाते. 

             .              

या दिवसात दक्षिण भारतीय महिला घराला फुलांनी सजवातात. असे म्हटले जाते कीथिरुओणम या दिवशी वर्षातून एकदा असुर राजा महाबली त्याच्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळामधून धरतीवर अवरतो असे मानले जाते. त्यामुळेच राजाला खुश करण्यासाठी आंबट-गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवत सामूहिक रितीने त्याचे भोजन केले जाते.विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात ढकलले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं. 

                                   

ओणम सणावेळी नावस्पर्धानृत्यसंगीतसमहाभोज यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते. या सणाच्या दिवशी घरातील सदस्य पारंपरिक वेशात दिसतात. त्याला 'ओनाकोड्डीअसंही म्हणतात. यामध्ये स्रिया सफेद व गोल्डन रंगाची काठ असलेली साडी परिधान करताततर या दिवशी घरातील वयोवृद्ध व्यक्ती स्वतःच्या हाताने नवीन कपडे घरातील इतर सदस्यांना देतात.  तिरुओणम हा सणाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी महाबळी राजा पाताळातून पृथ्वीवर येतो अशी समजूत आहे. यानिमित्ताने ११ वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी केली जाते. पारंपरिक असे चविष्ट पदार्थ घरातील महिला मोठ्या उत्साहाने बनवताततर खाद्यपदार्थांची ही मेजवानी केळीच्या पानांवर वाढली जाते. कधी कधी या पदार्थांची संख्या अकरांहून अधिकही असते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या