Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे- भाग्यश्री बिले यांचे प्रतिपादन

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यानी केले. शहरातील स्टेशनरोड येथील जिल्हा सहकारी बँक समोरील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व संत गाडगे महाराज छात्रालय येथे त्यांच्या हस्ते गणपतीच्या आरतीचे अयोजन करण्यात आले होते.     

     

यावेळी राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी श्रीमंती बिले यांचे स्वागत यांनी केले.  यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना श्रीमती भाग्यश्री बिले यांनी सांगितले की, या शाळेचा परिसर खूप सुंदर व स्वच्छ वाटला परिसरात चांगले झाडे असल्यामुळे प्रसन्न वाटत आहे. वसतिगृहात तुम्ही राहत असल्यामुळे व येथे खूप चांगले मैदान उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला खेळामध्ये सराव कारणासाठी खूप चांगली संधी आहे. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे. तसेच येथे तुम्हाला भरपूर जीवलग मित्र भेटत आहेत त्यामुळे खूप आनंदात राहिले पाहिजे. शाळा विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ॲड. शिवाजीराव काकडे  व जिल्हा परिषद सदस्य सौ. हर्षदाताई काकडे  यांच्या नेतृत्वात संस्था करत असलेल्या प्रगती खूप गतिशिल आहे असे बिले यांनी सांगितले.

 

यावेळी संत गाडगे महाराज छात्रालय वसतिगृह अधिक्षक बाबासाहेब पातकळ यांनी वसतिगृहाची माहिती दिली व बिले यांचे आभार मानले. यावेळी युवा नेतृत्व संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला .यावेळी संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग  काकडे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची माहिती घेऊन सूचना केल्या. आरतीसाठी व कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक बाबासाहेब लोंढे,सतिश काळे,गणेश काथवटे ,संजय सकट,सुशील ननवरे,आबासाहेब बेडके, प्रवीण उर्किडे,अशोक चव्हाण,संभाजी आठरे,महेश पोटफोडे,राहूल लबडे,विजय वाणी तुकाराम विघ्ने आदी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या