लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – बडीसाजन ओसवाल श्रीसंघापुढे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. समाजाचे दौड रोड वरील नवीन भव्य मंगलकार्यालयाचे काम प्रलंबित आहे. तसेच समाजातील गरीब गरजू नागरिकांना घरकुल देण्याची योजनाही लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सहकार्याची गरज आहे. इतर समाजांपुढे नवा आदर्श निर्माण करत सबका साथ समाजका विकास या विचाराने सर्व मिळून हे शिवधनुष्य आपण पेलू. बडीसाजन संघाच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवून समाजाला सुदृढ करणार आहे. समाजासाठी काम करण्याची बऱ्याच नागरिकांची इच्छा आहे. यासाठी विविध कामांसाठी विविध समितींचे गठन आम्ही करणार आहोत. समाजातील सर्व घटकांना पिढ्यानपिढ्या केलेल्या कामाचा फायदा होईल असेच काम आम्ही करणार आहोत अशी ग्वाही देतो. पुढील एक वर्षात समाजातील गरीब व गरजू नागरिकांना हक्काचे घरकुले देवून स्व.विलास लोढा यांचे स्वप्न पूर्ण करू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रेमराज बोथरा यांनी केले.
श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाच्या २०२२ – २५ वर्षासाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सीए मोहन बरमेचा यांनी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडून आलेल्या नूतन विश्वस्तांची घोषणा केली. यावेळी पोपटलाल कटारिया, अजित कर्नावट, धरमचंद कोठारी, सुमतिलाल कोठारी, नरेंद्र चोरडीया, मिलिंद जांगडा, राजेंद्र ताथेड, नरेंद्र बाफना, राजेंद्र बोथरा, दिपक बोथरा, प्रेमराज बोथरा, अनिलकुमार लुंकड, पोपट लोढा, मनोजकुमार शेटीया, विशाल शेटीया आदी विश्वस्त बिनविरोध निवडून आले. लगेच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाच्या नूतन अध्यक्षपदी प्रेमराज बोथरा यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष धरमचंद कोठारी, सेक्रेटरी विशाल शेटीया, सहसेक्रेटरी अनिल लुंकड, खजिनदार मिलिंद जांगडा आदींच्याही नियुक्तींची घोषणा निवडणूक अधिकारी सिए सुशील जैन यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अध्यक्ष प्रेमराज बोथरा पुढे म्हणाले, बडीसाजन संघाची बिनविरोध निवडणूक होण्यासाठी समाजातील श्रेष्ठींनी भरपूर परिश्रम घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. बोथरा परिवार पूर्वीपासून समाजाची तनमनधनाने सेवा करत आहे. समाजाचा आदेश म्हणून संस्थेचे अध्यक्षपद घेतले आहे. अध्यक्षपद हे शोभेसाठी नसून सेवेसाठी आहे या भावनेने काम करणार आहे.
यावेळी जेष्ठ सभासद अशोक कोठारी म्हणाले, संस्थेचे माजी अध्यक्ष विलास लोढा यांच्या निधनाने समाज पोरका झाला आहे. त्यांच्या पाश्च्यात झालेली ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी वसंत लोढा यांनी महत्वाची भूमिका बजावली. स्व.लोढा यांनी सुरु केलेल्या कार्याचा वारसा प्रेमराज बोथरा यांनी पुढे नेत आदर्शवत काम करावे.
रमेश बाफना म्हणाले, राज्यात नावाजलेल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध करून समाजाने चांगला पायंडा पाडला आहे. नव्या कार्यकारणीने यापेक्षा अधिक उंचीचे काम करावे.
अनिल कोठारी म्हणाले, स्व.विलास लोढा यांनी आत्मविश्वासाने व धाडसाने जे काम सुरु केले ते नव्या पदाधिकाऱ्यांनी पुढे नेत वाढवायचे आहे. लवकरात लवकर घरकुल योजना पूर्ण करावी.
यावेळी धीरज सुराणा, किसन बेदमुथा, राजेश गुगळे, सूर्यकांत धोका आदींनी मनोगत व्यक्त केली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रास्ताविकात सचिव विशाल शेटीया यांनी श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाच्या कामाबद्दल माहिती देवून सभासदांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले
0 टिप्पण्या