Ticker

6/Breaking/ticker-posts

मेंढपाळांच्या बालकांचे सामाजिकसर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश; सामाजिक संस्थेची मदत घेण्याचे निर्देश

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)     


अहमदनगर.दि.१३:- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील काही मेंढपाळांनी  बालकांना  मेंढी व दोन हजार रुपयांत विकत घेऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या क्षमतेच्या पलिकडे त्यांच्याकडून मजूरी करुन घेत असल्याच्या घटनेची  पोलिसांनी दखल घेऊन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अल्पवयीन व बेठबिगार बालकांची सुटका केली आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय वेठबिगार समितीची आढावा बैठक आज, दिनांक १२ सप्टेंबर,२०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत वेठबिगार व बालकामगार यांच्यावर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी व भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होणार नाही यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांकडे असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करुन सामाजिक संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 


कोणत्याही गावात किंवा शहरात बालकामगार व वेठबिगार आढळून आल्यास, नागरिकांनी संबंधीत पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे अवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वेठबिगार समितीच्या अध्यक्षा पल्लवी निर्मळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या