Ticker

6/Breaking/ticker-posts

बीडी कामागारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठीअर्ज करण्याचे आवाहन

 

  


 

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)     

अहमदनगर दि. 12 :- बीडी कामगारांच्या शिक्षण घेणा-या पाल्यांना केंद्र सरकाकडून दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.  आयुक्त कामगार कल्याण नागपूर यांच्या तर्फे बीडी कामगारांच्या  शिक्षण घेणा-या पाल्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी शिष्यवृत्ती मिळणे करिता नजिकच्या संगणक केंद्रात जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावेत. 1 ली  ते 12 वी पर्यंत 30 सप्टेंबर, 2022  व  12 वी नंतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम  वैद्यकीय, शेतकी, एम.बी.ए., इंजिनिअरींग कोर्सेस या  अभ्यास क्रमासाठी 31 ऑक्टोबर, 2022 ही फॉर्म भरण्याची अंतिम तारिख आहे.


            या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी  यांना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल http://scholarships.gov.in वर ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर शिक्षण संस्थेशी संपर्क साधून ऑनलाईन फॉर्म भरल्याची पडताळणी करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.


            ऑनलाईन फॉर्म भरण्यास काही अडचणी आल्यास दूरध्वनी क्रमांक  0712- 2510200       यावर किंवा wcngp-labour@nic.in या ईमेल वर  संपर्क साधावा.  तसेच श्रम कल्याण संस्थेव्दारा जवळच्या  प्रभारी वैद्यकीय अधिकारी  यांच्याशी व्यैयक्तिक  संपर्क करु शकता. वरील तारखेनंतर ऑनलाईन फॉर्म स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे वैद्यकीय अधिकारी, बीडी कामगार वेलफेअर फंड कार्यालय, अहमदनगर यांनी  पत्रकाव्दारे कळविले आहे.           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या