Ticker

6/Breaking/ticker-posts

.. तर देश चीनकडे गहाण असता- खा. विखे पाटील ; खा.सुप्रिया सुळेंच्या टिकेला खा. सुजय विखेंचे खणखणीत उत्तर..!







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : महागाईचा मुद्दा, संजय राऊतांची ईडी कोठडी यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप खासदार सुजय विखे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यूपीए सरकार असतं तर देश चीनकडे गहाण असता, अशा परखड शब्दांत खासदार विखे पाटील यांनी सुनावले.


विखे म्हणाले, चीनने १६५ देशांना विकासासाठी कर्ज दिले. आता चीन या सर्व देशांना अडकवू पाहत आहेत. मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी कुठेही भीक मागण्यासाठी गेले नाही. त्यांनी योग्यवेळी देशहिताचे निर्णय घेतले. याउलट आज जर यूपीए सरकार असतं तर देश चीनकडे गहाण असता.


संजय राऊत ईडी कोठडीमध्ये आहेत यावर बोलताना विखे म्हणाले, सर्व गोष्टी कागदोपत्री आहेत. न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा देत दहा दिवसांची कोठडी सुनावली नाही, यावर कोणी बोलत नाही. शेवटी न्यायालयीन प्रक्रियेवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो.


सुजय विखेंच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुजय गोड मुलगा, त्याला माझ्या शुभेच्छा. संजय राऊतांवरील कारवाई आम्हाला अपेक्षितच होती. आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.


महागाईच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्तेत असलेल्या सरकारला महागाई दिसत नाही हे हास्यापद आहे. त्यांचं वाचन कमी आहे किंवा ते वास्तविकतेपासून दूर आहेत. उत्तरप्रदेशमधील एक मुलगी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगते, माझी पेन्सिल महाग झाली आहे. हे दुर्देवी आहे. असे सांगितले.


विखे विरुद्ध पवार हा परंपररागत राजकीय वाद पुढच्या पिढीतही धगधगत आहे. याचा प्रत्यय येतोय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या