Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार मोनिकाताईंचे चिरंजीव कृष्णासह धाकट्या पंढरीचे दर्शन








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :- तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर आषाढी एकादशीची धूम असून  तालुक्यातील वरूर् येथील  विठुरायाचे दर्शन  घेण्यासाठी अलोट गर्दी लोटली. शेवगाव - पाथर्डीच्या आमदार मोनिका ताई यांनीही चिरंजीव कृष्णासह हजेरी लावत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

यावेळी आ. राजळे यांनी सर्व व्यवस्थाही स्वतः फिरून पाहिली.  सर्वांशी संवाद साधून भाविक - भक्तांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामूळे भाविक - भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.  यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. सर्व व्यवस्था पहान्याच्या सूचना आ. राजळे यांनी कार्यकर्त्यना दिल्या.


दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असूनही सुमारे ५० हजार विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त ' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरूर येथे श्रीविठ्ठल - रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. टाळ - मृदंगाचा निनाद व ' पुंडलिक वरदा हरी विठ्ठला...' च्या जयघोषात विठ्ठल भक्त अक्षरशः भक्तीरसात चिंब झाले. 


श्रीक्षेत्र वरुर येथे श्रीविठ्ठलाचे सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे पुरातन भव्य मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीविठ्ठल - रुक्मिणीच्या सावळ्या वालुकामय मूर्ती स्वयंभू असल्याने वारकरी संप्रदायात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील त्रिवेणी संगमावर वैष्णवांचा मेळाच भरला होता. पंचक्रोशीतून वरुरला येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या