Ticker

6/Breaking/ticker-posts

आता.. माजी मंत्री शंकरराव गडाखही शिंदे सेनेच्या वाटेवर ?

 आज नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांसमवेत बैठक

गडाख काय निर्णय घेतात याची नगर जिल्ह्यासह राज्यभर उत्सूकता











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर :- गेले महिनाभरापासून शिवसेनेला एका मागोमाग एक असे जबर राजकिय हादरे बसत असून बंडाचे सत्र थांबायला तयार नाही. त्यातच नेवासा मतदार संघाचे आमदार  माजी मंत्री शंकरराव गडाख  यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्याने ते देखील लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


राज्यातील राजकारण गेले महिन्यापासून दिवसागणिक नाट्यमय वळण घेत आहे. सेनेचे निष्ठावान शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी सेनेला खिंडार पाडून सुरुवातीस १४ आमदार घेऊन बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर आठवडाभरात त्यांचे संख्याबळ वाढतच गेले. अखेरीस ५०  आमदारांच्या साथीने त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली.


शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष आता न्यायालयात गेला आहे. उढव ठाकरे यांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. खरी शिवसेना आमचीच असे दावे - प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे, याचीही खिंचा तानी सुरू आहे. तसेच१६ आमदारांचा निर्णय आज कोर्ट देणार आहे..तो काय लागतो, यावर पुढील राजकीय समीकरने ठरतील.


शिवसेनेसाठी  शिंदेंची ही बंडखोरी सर्वात मोठी व आव्हानात्मक ठरली. किंबहुना  सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.  आमदार गेले.. मुख्यमंत्री पद गेले.. सत्ताही गेली. एवढ्यावर ती थांबायला तयार नाही. उरले सुरले समर्थक आमदार देखील शिंदे यांच्या गटात अजूनही दाखल होत आहेत, हे विशेष..


दरम्यान राज्यस्तरीय ह्या राजकीय घडामोडी सुरू असताना महाआघाडी सरकारला आणि खास करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्व प्रथम साथ देणारे नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या गोटात सध्या चलबिचल सुरू आहे.  सरकार गडगडल्यामुळे अडीच वर्षे कॅबीनेट मंत्रिपदाची लॉटरी लागलेले गडाख सुद्धा राजकीय दृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. पुन्हा एकदा शिंदे गटात सामील होऊन सत्तेची संधी साधावी, असा सूर आळवला जात आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून त्यांनी " मला आपल्याशी काही बोलायचे आहे " अशी  भावनिक साद कार्कर्त्यांना घातली आहे. 


हा मेळावा आज सोमवार दि. ११ रोजी सोनई येथे सकाळी १० वाजता होत असून ते काय भूमिका घेतात, याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या