Ticker

6/Breaking/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस टोचून

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सोमवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. आता नरेंद्र मोदी यांनी एखादी गोष्ट केली आणि त्याची चर्चा झालीच नाही, असे फार अपवादाने घडते. किंबहुना नरेंद्र मोदी हे कोणतीही कृती ही जाणीवपूर्वक आणि भविष्यातील घडामोडींचा अंदाज घेऊन करतात. याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टायमिंग अत्यंत अचूक आहे, ही बाब त्यांचे कट्टर विरोधकही अमान्य करणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एम्स रुग्णालयातील कोरोना लसीकरण कार्यक्रमही सध्या असाच चर्चेत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वेशभुषा, त्यांचा वावर आणि काही योगायोगाने घडलेल्या (?) गोष्टींवरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.


हातावर सुई टोचली तरी मोदींच्या चेहऱ्यावर स्माईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक गोष्ट त्यांच्या समर्थकांना भावते. आतादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लस घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी हातावर इंजेक्शन घेताना पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर हास्य नाही. पंतप्रधानांची ही कृती त्यांच्या समर्थकांना भावली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

स्वदेशी लसीला प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात प्रखर राष्ट्रवाद हा फॅक्टर नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून ते अगदी शेतकरी आंदोलनातील परकीय सेलिब्रिटींच्या हस्तक्षेपाला विरोध करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी राष्ट्र प्रथमहे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. आतादेखील त्यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनया स्वदेशी लशीला प्राधान्य दिले. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनमुळे साईड इफेक्टस होण्याची जास्त शक्यता आहे, असा गैरसमज सध्या अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात कोव्हॅक्सिनचा दर्जा आणि सुरक्षिततेविषयी शंका होत्या. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोव्हॅक्सिन लच टोचून घेण्याचा कृती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.

पंतप्रधान मोदींनी एकाच बाणात मारले अनेक पक्षी?

 एखादी गोष्ट लोकांच्या मनावर बिंवण्यात किंवा एखाद्या प्रतिकाचा वापर करुन ती गोष्ट व्यापक स्तरावर नेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्याच्या घडीला कोणीच धरु शकत नाही. एम्स रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि योगायोगाने’ घडलेल्या काही गोष्टी सध्या चर्चेचा विषय आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आसामपुदुचेरी आणि केरळचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव आणि इतर योगायोग’ प्रतिकात्मक राजकारणाचा भाग असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारुन चालणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या