Ticker

6/Breaking/ticker-posts

खडसेंच्या विजयासाठी अजितदादा मैदानात; आमदारांच्या बैठका , समजूत अन् तंबी सुद्धा

 विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज सोमवारी मतदान

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला गारद केल्यानंतर भाजपने आता माजी मंत्री  एकनाथ खड्से यांच्यावर निशाणा लावल्याचे वृत्त आहे. विधानसभेतील विरोधपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीची सारी सूत्र त्यांचे विश्वासु सहकारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान या पाडापाडीच्या राजकारणात खडसेंचा आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचाच घात होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'रिमोट' स्वत:कडे घेतला आहे. त्यातही राज्यसभेत महाविकास आघाडीसोबत झालेला दगाफटका आणि आता विधान परिषदेला असेलेले गुप्त मतदान या पार्श्वभूमीवर अजित पवार अधिक सतर्क झाले आहेत.


आज दि. १९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना आला. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र निवडणूकीला सामोरे जाण्यापूर्वी आज महाविकास आघाडी आणि भाजपने आपआपल्या आमदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय व्हीप देखील काढले. या निवडणुकीत भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास 20 मतांची गरज आहे.


तर काँग्रेसला त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 8 मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे पुरेशी मते असली तर एकनाथ खडसेंना मतदान होऊ नये यासाठी भाजप विशेष प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याच गोष्टीची पूर्ण जाणिव असलेल्या अजित पवार यांचा खडसेंच्या विजयासाठी आज दिवसभर आटापिटा चालला होेता. अजित पवार यांनी दिवसभरात राष्ट्रवादीसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला होता.


या बैठकांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावर त्यांना या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देखील दिले. शिवाय राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना व्हिप प्रमाणे मतदान करण्याची तंबी दिली. मत फुटल्यास किंवा दगाफटका झाल्यास आणि दुसऱ्या उमेदवाराचा अर्थात खडसेंचा पराभव झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा सज्जड दमच त्यांनी आमदारांनाा दिल्याचे समजले.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या