Ticker

6/Breaking/ticker-posts

घोडा मैदान जास्त दूर नाही, काय आहे ते समोर येईलच ! ; जयंत पाटलांचा दावा

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : सोमवारी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे.  निवडणुकीतील विजयासाठी मुंबईमध्ये बैठकावर बैठका सुरु आहेत. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांकडून बेरजेचे राजकारण जुळवीत आकडेमोड केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.


महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. विधान परिषदेचेच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल, हे आम्ही पाहत आहे, असेही पाटील म्हणाले.


यावेळी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला भाजपचे ९ की १३ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत? यावर पाटील म्हणाले, भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर आता बोलण जास्त महत्वाच ठरणार नाही. घोडा मैदान जास्त दूर नाही, उद्याच काय आहे ते समोर येईल, असे सूचक विधान पाटील यांनी केले.


आघाडीतील तिनही पक्षांचे आमदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता बैठक सुरू होणार आहेत. राष्ट्रवादीने व्हीप जारी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही, मतदार संघातील विकास कामावर चर्चा झाली, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या