Ticker

6/Breaking/ticker-posts

पांडुरंग विद्यालयाचा दहावीचा उत्कृष्ट निकाल ; गुणवंतांचा सत्कार

 


   





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या वरुर (ता.शेवगाव) येथील श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वच्या सर्व ४३ विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

वरुर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या गायत्री अर्जुन चव्हाण(४६२), पूजा अनिल कोरडे(४५४), वैष्णवी संदीप लव्हाट(४४७)या विद्यार्थिनींचा तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या ईश्वरी सोमनाथ म्हस्के(४४१), रोहन भारत म्हस्के (४४१), वैष्णवी प्रकाश म्हस्के (४३७), पल्लवी दीपक तुजारे(४२६), चैताली बाप्पू खरे(४१७) आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक सुशिलकुमार नागापुरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खडके, उपाध्यक्ष भाऊसाहेब वावरे आदींसह शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या