Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यापीठाने अतिरिक्त अभ्यासक्रम तात्काळ मागे घ्यावा ; उपकेंद्राबाहेर विद्यार्थ्यांची निदर्शने


 अहमदनगर :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने बीए प्रथम वर्ष, एमए द्वितीय वर्षासाठीच्या  विद्यार्थ्यांसाठी डेमोक्रसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्सहा अतिरिक्त आभ्यासक्रम सुरु केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक घडी विस्कटलेली असताना हा नवीन आभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादणे अन्यायकारक असून त्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी  तात्काळ स्थगित देण्यात यावी अशी मागणी नगर विद्यार्थी कॉंग्रेस एनएसयूआयच्या वतीने करण्यात आली आहे. 

        शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रविणभैय्या गीते पाटील, योगेश जयस्वाल, धनंजय महारनोर, महेश कचरे, निखील गलांडे, प्रकाश थोरात, संकेत गवळी, ओम जगताप, ओंकार दरेकर, ऋषिकेश चितळकर महेश सानप, अमित गुंड, आदित्य बेरड, सिद्धांत गिरवले, ज्ञानेश्वर लोखंडे, सुरज बोडके, शिवम करांडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागणीसाठी विद्यापीठ उपकेंद्रा बाहेर विद्यार्थी कॉंग्रेसने निदर्शने केली. 

         निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे महाविद्याये अजूनही सुरळीतपणे सुरू होऊ शकलेली नाहीत. अनेक परीक्षा विद्यापीठ नीटपणे पार पाडू शकलेले नाही. जे पूर्वी पासूनचे निर्धारित आभ्यास विषय आहेत त्यांचे अध्यापन पार पाडणे, ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करणे या प्रक्रियेत अनेक अडचणी आलेल्या आहेत. असे असताना विद्यापीठाने नवीन आभ्यासक्रम, त्याच्या परीक्षा विद्यार्थ्यांवर लादल्या आहेत. नवीन आभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी चांगला असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक, राजकीय जाणीवेत भर घालणारा आहे. आम्ही त्याचे निश्चितच स्वागत करतो असे निवेदनात म्हटले आहे. 

      सध्याची कोरोना परिस्थिती पाहता नव्याने लादलेल्या कोर्सेसमध्ये विद्यार्थी नापास झाले तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. यामध्ये त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आभ्यासक्रम तात्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी कॉंग्रेसने केली आहे. मराठी, हिंदी भाषेचे देखील नवीन कोर्स विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर लादले आहेत. यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. विद्यापीठाने मागणीची दखल न घेतल्यास विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत लादलेल्या कोर्सवर आणि त्यांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

    याबाबत विद्यापीठाने तात्काळ उचित निर्णय न घेल्यास प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्ग्दर्शानाखाली या विषयावर विद्यार्थी कॉंग्रेस आवाज उठवील, असे इंजि. चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप यांनी म्हटले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या