Ticker

6/Breaking/ticker-posts

आमच्यासाठी अवघड काही नाही : बाळासाहेब थोरात ; आघाडीने घेतला राज्यसभेचा धसका; दुसरी फेरी नकोच !

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : विधान परिषद  निवडणुकीबाबत सध्या मुंबईमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांची परतफेड करायची यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, आमच्यासाठी अवघड नाही. सर्व एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रमुख नेते एकत्र बसून स्टॅटेजी ठरवत आहोत. त्यानंतर त्या-त्या पक्षाने काम करायचे आहे. इतके साधे सुत्र यामध्ये आहे. एक बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमत्र्यांसोबत होईल. त्यामध्ये आणखी बारकाईने नियोजन करू, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

 

विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच फेरीत ६ ही उमेदवार कोटा पूर्ण करतील, यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २६ चा कोटा आवश्यक आहे. अश्यात मतदान बाद होऊ नये याची काळजी घेत मतदान कसे करावे याची ट्रायल आमदारांकडून घेतली जात आहे.


राज्यसभेप्रमाणे पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या 6 उमेदवारांनी कोटा पूर्ण केला नाही, तर पुन्हा पहिली पसंती मतांची गणिते जुळवण्याची वेळ येईल. त्यात संख्याबळ जुळले नाही तर उमेदवार पराभूत होऊ शकतो, याची काळजी घेत महाविकास आघाडीने आपल्या कोणत्या उमेदवाराला किती मतं द्यायची हे ही गुपित ठेवले आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.


भाजपाकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत,  त्यातच पहिली पसंती मतदान मोजण्याची वेळ आली तर भाजपचे पारडे पुन्हा जड होण्याची भीती महाविकास आघाडी मधील नेत्यांना आहे. त्यामुळे आपण पहिल्या फेरीमध्येचे कोटा पूर्ण करायचा यासाठी आघाडीचा आटापिटा सुरु आहे. लहान पक्षांची जुळवा-जुळव पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे पूर्ण संख्याबळ आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील सगळी समिकरणे जुळवली आहेत. बहूमताने आमचे उमेदवार विजयी होईल, असेही पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत राहिलेले दोष दुरूस्त झालेले या निवडणुकीत दिसतील. आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. आम्हाला आठ मतांची गरज आहे, हे खरे असले तरी भाजपला वीस मतांची गरज आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या