Ticker

6/Breaking/ticker-posts

भ्रष्टाचार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नाही- विरोधीपक्ष नेते फडणवीस


देवेंद्र फडणवीस  यांचे  शिर्डीत दर्शन 
Lokneta News 

शिर्डी :  भाजपाने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत, यावर उत्तर देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच आहे. मात्र त्यांच्याकडे  कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी भावनिक भाषण केले असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

साई दर्शनासाठी ते  शिर्डीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी  माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजीमंत्री गिरीश महाजन, आ. अभिमन्यू पवार, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, मुख्य कार्यकारी अधिकरी भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, योगेश गोंदकर, राम आहेर, नरेश सुराणा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 फडणवीस म्हणाले की,  तपास यंत्रणा तथ्यांच्या आधारावर तपास करीत आहेत. कोण कुणाचा नातेवाईक आहे, हे बघून कारवाई करीत नाही. कोणाला कुणाच्या कुंटुंबापर्यंत जायचा काही प्रश्नही नाही. किरीट सोमय्या यांचे आज प्रतीकात्मक हातोडा आंदोलन होते. कारवाई न्यायालय किंवा संस्था करणार आहे. भाजपाची संघर्षाची भुमिका असून आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही आणि भ्रष्टाचारा विरोधातला आवाज उचलतच राहणार आहे. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही 2024 साली स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  यावेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर  चौफेर टोलेबाजी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या