Ticker

6/Breaking/ticker-posts

उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळवून देणार; ना. विजय वडेटटीवार स्वातंत्र्यानंतरही ओबीसींना न्याय मिळाला नाही-कल्याण दळे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 मुंबई :/ नगर : -ओबीसीच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी शेवटच्या बहुजन समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी बहुजन व्हीजेएनटी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या देशातील उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच आपला लढा सुरु राहिल, असे प्रतिपादन राज्याचे बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी केले.


नुकताच  मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून  ना. विजय वडेट्टीवार यांची तर ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कल्याण दळे यांची निवड करण्यात आली. या परीषदेस विधान परिषदेचे आमदार राजेश राठोडमाजी आमदार रामराव वडकुतेअल्पसंख्यांक समाजाचे राष्ट्रीय नेते शब्बीर अन्सारीओबीसी नेत्या प्रा. सुशीला मोराळेमहाज्योती चे संचालक लक्ष्मण वडलेम्हाडा चे अध्यक्ष शिवाजी धवळेसमन्वयक अरुण खरमाटे,  बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते संदेश चव्हाणओबीसी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेपरीट समाजाचे नेते देवराव सोनटक्केगुरव समाजाचे नेते प्रताप गुरवसुतार समाजाचे नेते चंद्रकांत गवळीकुमावत समाजाचे नेते साहेबराव कुमावतशशिकांत आमनेदत्तात्रय चेचरसतीश कसबेदसरथ राऊतसतीश दरेकरसाहेबराव पोपळगटधनंजय शिंगाड़ेप्रकाश पवारसाधना राठोड सह राज्यातील प्रमुख नेत्यांसह बारा बलुतेदार अलुतेदारएसबीसीव्हीजेएनटीअल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी उपस्थित होते

 

कल्याणराव दळे  यांची ओबीसी व्हीं जे एन टी बहुजन परिषद कार्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल नगर जिल्हा  बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने त्यांचा  जिल्हा अध्यक्ष,नाभिक महामंडळ प्रांत उपअध्यक्ष  माऊली गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी  नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष  बाळासाहेब भुजबळबारा बलुतेदार महासंघ महिला शहर जिल्हा अध्यक्ष अनुरिता झगडेजिल्हा मार्गदर्शक  बाबुराव दळवी , जिल्हा उपाध्यक्ष  अनिल इवळेशहर अध्यक्ष श्याम भाऊ औटीसचिव  सुभाष बागुल,  संजय उदमले,  तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते .

                                                           

 कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कल्याण दळे म्हणाले की या राज्यातील बारा बलुतेदार अलुतेदार वंचित उपेक्षित समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील व शेवटच्या घटकातील सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देऊ. या कार्यक्रमात राज्यातील सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या