Ticker

6/Breaking/ticker-posts

डाटा सेंटर : माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालकांची निदर्शने

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत सन २०१५ मध्ये दिलेले ऑनलाईन प्रणालीचे काम अद्यापही मोठ्या प्रमाणात अपुर्ण आहे. रविवारी (दि.२७ फेब्रुवारी) सोसायटीच्या बैठकित विषय क्रमांक ९ नुसार डाटा सेंटरचा विषय घेण्यात आला होता. ही बैठक सुरु होण्यापुर्वी सदर विषय स्थगित करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी विरोध दर्शवून निदर्शने केली. तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जो पर्यंत ऑनलाईन प्रणालीच्या कामाबाबत चौकशी होत नाही, तो पर्यंत डाटा सेंटरचा विषय स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात विरोधी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद आत्माराम दहिफळे, सुनील दानवे, दिलीप बोठे, अक्षय जावळे, एस.एफ. भळकट, पी.आर. बारगजे, पी.पी. साठे, द. खाडे, रमाकांत दरेकर, एस.जी. आराख आदी सहभागी झाले होते.


अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारच्या बैठकित सत्ताधारी संचालक मंडळाने संस्थेचे डाटा सेंटर भाडेतत्वावर देण्याबाबत विषय घेतला होता. हा विषय गंभीर व आर्थिक खर्चिक स्वरूपाचा असल्यामुळे तसेच संस्थेच्या सर्व कामकाजाबाबत गोपनीय बाबी त्रयस्थ यंत्रणेकडे जाऊ नये, यासाठी विरोधी संचालकांनी या विषयाला विरोध दर्शविला आहे. हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवून सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संस्थेने १० जून २१०५ रोजी फक्त एक वर्षाच्या कराराने संस्थेचे ऑनलाइन प्रणालीचे काम या संस्थेत मानधन तत्वावर काम करत असलेल्या एका कर्मचार्‍यास १८ लाख रुपयात पूर्ण करून देण्यासाठी दिले होते. या ऑनलाईन प्रणालीसाठी तब्बल सुमारे ५५ ते ६० लाख रुपये खर्च करुन देखील ते अद्यापि अपुर्ण असल्याने विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. तर सत्ताधारी संचालक मंडळाने बहुमताने दोन महिन्यापूर्वी पारनेर शाखेत डाटा सेंटरच्या नावाखाली ऑनलाइनचे काम नवीन व्यक्तीला दिलेले आहे. पूर्वी दिलेल्या ऑनलाइन प्रणालीचे काम अपूर्णच असल्याचे हा स्पष्टपणे पुरावा असल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने जिल्हा उपनिबंधकांनी २५ फेब्रुवारी रोजी सोसायटीच्या सचिव व व्यवस्थापकांना या प्रकरणी तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे चौकशी आदेश दिले आहे. यानंतर सोसायटीच्या संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या सभेत पुन्हा डाटा सेंटरचा विषय घेण्यात आल्याने विरोधी संचालकांनी त्याला कडाडून विरोध दर्शविला. तर तीन वर्षे जी कामे केले नाही, ती कामे तीन महिन्यात करण्याचा अट्टहास कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.


जिल्हा उपनिबंधकांकडून संस्थेच्या ऑनलाईन प्रणाली कामाची चौकशीचे पूर्ण होईपर्यंत डाटा सेंटरबाबत निर्णय घेण्यात येऊ नये, डाटा सेंटर भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा विषय रद्द करण्यात यावा, ऑनलाइनच्या कामाची चौकशी निपक्षपातीपणे करण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या