Ticker

6/Breaking/ticker-posts

म्हणून, शंकररावांना मंत्री केले ; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नेवासा:  शंकरराव गडाख हा विश्वासू आणि कामाचा माणूस आहे. सोबत घेऊन काम करायचे असेल तर त्यांना मंत्री केले पाहिजे असे उद्धव साहेबांनी सांगितल्याने शंकररावांना मंत्री केल्याचे गौरवोद्गार  राज्याचे पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे  यांनी काढले.

 नेवासा तालुक्यातील सोनई येथील  मुळा सहकारी साखर कारखान्याने  मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या ८० कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी रोजी राज्याचे पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुळा उद्योग समुहाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख ,खा. सदाशिवराव लोखंडे,भाऊ कोरेगावकर,युवा नेते उदयनराजे गडाख,नगरच्या महापौर सौ.रोहिणी शेंडगे,सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाढे,उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,अभिषेक कळमकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड,काशिनाथ दाते,दिलिप सातपुते, संभाजी कदम, स्मिता आष्टेकर

मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले,भाऊसाहेब मोटे,कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी प्रास्ताविक केले.

 ना.ठाकरे पुढे म्हणाले,मंत्री म्हणून ठोस कामे घेऊन जनते समोर जाणे हे माझी आणि शंकररावांजीची जबाबदारी आहे.कोविड संपू दे आणि नवीन महाराष्ट्र घडविण्याची ताकद दे हीच ईश्वराकडे मागणी आहे. लिक्विड झिरो डिस्चार्ज करून मुळा कारखान्याने झिरो लिक्विड डिस्चार्ज या तत्त्वावर यंत्रणा कार्यान्वित करून होणारे प्रदूषण रोखले आहे,तसेच राजकारणातील प्रदूषण महाराष्ट्रात आपण दूर ठेवलेले आहे.त्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत.रोज नवीन आरोप,रोज खालची पातळी.प्रत्येक ठिकाणी राजकारण सुरू आहे.आता राजकारणातील प्रदूषण कोणतं हे तुम्हीच ठरवा अशी कोटी भाजपचे नाव न घेता ठाकरे यांनी केली.परंतु सत्तेचा माज न आणता आघाडी सरकार जनतेची कामे करीत आहे. कोविड काळात सरकारने चांगली कामगिरी केलेली आहे.शेतकरी, महिला व तरुणांसाठी सरकार काम करीत आहे.कोरोना मुळे होणारा थेट संवाद खुंटला होता,तो आता सुरू झालेला आहे.येथे आल्यावर सर्वांची एकजूट दिसून आली,ती अशीच जपून ठेवा.पहिल्या दिवसापासून शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.ते अत्यन्त विश्वासू व कामाचा माणूस आहे.

 

ना.शंकरराव गडाख म्हणाले, मुळा कारखान्याच्या डिस्टिलरीमुळे प्रदूषण होते या नावाखाली राजकिय दबावामुळे भाजप सरकारच्या काळात कारखान्याला नोटीस आली.कारखाना गाळप क्षमता वाढीला विरोध झाला.यात प्रदूषण कमी आणि राजकारणच जास्त होते त्यामुळे हा प्रकार घडला.त्यामुळे आता जुन्या डिस्टिलरीचे आधुनिकीकरण केले,इन्सनरेशन बॉयलर घेऊन लिक्विड झिरो डिस्चार्ज प्रकल्प केल्याने  आता प्रदूषण होणार नाही.

प्रतिदिन 1.5 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणारा व धाडसी निर्णय घेणारा जिल्ह्यात मुळा हा सहकारातील एकमेव कारखाना आहे.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत.शेतकऱ्यांचा विकास करायचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.अडचणीच्या काळात उद्धव साहेबांनी मदत केली ही जाणीव ठेवून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यात शिवसंवाद मेळावे घेऊन पक्ष बळकट केला जात आहे. जिल्ह्यात सेनेच्या १००० शाखा करणे व  पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे उपस्थितीत १ लाख शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

 शिवसेनेने आमचा सन्मान जपला...

शंकरराव तुम्ही सेने बरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला.ज्या पक्षासाठी आम्ही आयुष्य वेचले,वार झेलले त्यांनी आमचा भ्रम निराश केला.शेवटी उद्धव साहेबांनी न्याय दिला.उध्दवजीनी दाखवलेला विश्वास वाया जाऊ देऊ देणार नाही.या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ ही जागा जिंकू अशी परिस्थिती आहे.ठाकरे घराण्यांशी असलेले पूर्वीचे संबध तरुण पिढीने अधिक वाढवावेत. असे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सांगितले. 

 खा.सदाशिव लोखंडे म्हणाले,अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ऊसाचे रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प व्हावेत अशी केंद्राकडे सातत्याने करीत आहे. यावेळी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, नेवासा तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सुनील गडाख, बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे,पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, हरिभाऊ शेळके आदींसह ऊस उत्पादक शेतकरी व जिल्ह्यातील सेना पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या