Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर अर्बन बँकेत १५० कोटींचा असा झाला घोटाळा..!

 तत्कालिन चेअरमन, संचालक,अधिकारी, कर्जदारांवर गुन्हा दाखल

संचालकांसह अनेक अधिकारी आले अड्चाणीत



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 नगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे राजेंद्र ताराचंद गांधी (रा कोहिनूर गार्डन, माळीवाडा, नगर) यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. 

 आरोपींमध्ये सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील अर्बन बँकेचे दिवंगत चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, आशुतोष लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी आणि बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत घनशाम बल्लाळ यांचा समावेश आहे.

 फिर्यादीत म्हटले की, नगर अर्बन या बँकैचा मी सन 1984 पासून सभासद व खातेदार आहे. सन 2008 मध्ये नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचा सदस्य म्हणून निवडून आलो होतो, सन 2008 ते 2014 या कालावधीत मी नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचा सदस्य म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे बँकेचे दरवर्षी होणाऱ्या वैधानिक लेखापरीक्षणाबाबत मला ज्ञान आहे. सन 2013 मध्ये सदर नगर अर्बन बँकेचे रुपांतर नगर अर्बन मल्टीस्टेट बँक असे झाले. सन 2014 मधील  निवडणुकीत पॅनलचा पराभव झाल्याने पुढील संचालक मंडळामध्ये माझा सदस्य म्हणून सहभाग नव्हता. परंतु मी बँकेचा खातेदार व सभासद म्हणुन आहे. मी संचालक मंडळाचा सदस्य असल्याने मला यापूर्वी व आतादेखील बँकेच्या कामकाजाच्या विषयीचे कामाचे पुर्ण ज्ञान आहे. 

 सन 2015 पासुन नगर अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय, मुख्य शाखा व इतर शाखांमध्ये आजपर्यंत झालेल्या गैरव्यवहारांमुळे मला व बँकेच्या इतर सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले आहे. तसेच बँकेच्या ठेवीदारांना व खातेदारांना त्यांनी बँकेमध्ये विवीध योजनांमध्ये गुंतविलेल्या ठेवींचा परतावा, तसेच ठेवीची रक्कम व त्यांच्या इतर खात्यांमधील रकमा त्यांना परत मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मी बँकेचा सन 2015-16 2016-17, 2017-18 2018-19, 2019-20 2020 21 चे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व रिझव्ह बँकेचे तपासणीचे अहवालाच्या प्रती प्राप्त करून घेवून, त्याचे  अवलोकन केले. 

 नगर अर्बन बँकेत आजपर्यंत नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ, वरीष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबधीत व्यक्ती यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार करुन बँकेचे अपरिमीत नुकसान केले आहे. त्यामुळे मी वारंवार सदर गैरव्यवहारांची माहिती घेवुन त्याबाबत दखल घेतली. कारवाई होण्याकरीता नगर अर्बन बँकेवर नियंत्रण असणान्या सेंट्रल रजिष्टरर नवी दिल्ली व रिझर्व्ह बँक, मुंबई यांच्याकडे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे वेळो6वेळी पत्रव्यवहार केले आहेत. दोषी व्यक्तीं विरुध्द फौजदारी कारवाई करावी, अशीच उद्देशाने पोलीस अधीक्षक यांना निर्देश दयावेत याकरीता मी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे क्रि. रिट पिटीशन क्र. 1224/2020 अन्वये अर्ज दाखल करुन मागणी केली आहे. 

 रिट पिटीशन दाखल झाल्यानंतर नगर अर्बन बँकच्या वतीने डॉ. निलेश शेळके व इतर डॉक्टरांचे 23 कोटी 90 लाख रुपयांच्या कर्जप्रकरणांतील वैद्यकीय मशीनरी खरेदी न करता कर्जरकमेचा गैरउपयोग केल्याबाबत कोतवाली पोलिसात, टेरासॉफ्ट टेक्नलजीज या फर्मचे खात्यात चिल्वर स्वरुपात रकमा जमा दर्शवुन केलेले 3 कोटी रुपयांचे गैरव्यवहाराबाबत, नगर अर्बन बँकेचे शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवुन घेतेलेले सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांचे कर्जप्रकरणांबाबत, नगर अर्बन बँकेचे पिंपरी चिचंवड शाखेत झालेले 22 कोटी रुपयांचे कर्जप्रकरणातील फसवणुकीबाबत, यासह  बँकेत आणखी इतर गैरव्यवहार झालेले आहेत. नगर अर्बन बँकेचे सन 2015-16 2016-17 2017-18 2018-19, 2019-20 2020-21 चे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल, रिझर्व्ह बँकेचे तपासणीचे अहवाल व मला प्राप्त झालेले संबंधीत कागदपत्रांवरून मला खालील नमुद केले प्रमाणे इतर गैरव्यवहार, घोटाळे, अपहार व फसवणुक केल्याचे निदर्शनास आलेले आहे. 

 

1) मे. पारीस इस्पात, संगमनेर यांचे कर्ज खाते 2) मे. पुखराज ट्रेडींग कंपनी, संगमनेर यांचे कर्ज खाते 3) मे. पुखराज इस्पात, संगमनेर यांचे कर्ज खाते 4) मे हटेल सिटी हर्ट शिर्डी यांचे कर्ज खाते 5) मे. एस. एस. डेव्हलपर्स, शिर्डी यांचे कर्ज खाते 6) मे तुकाराम रंगनाथ एखंडे, जालना यांचे कर्ज खाते 7) में हटेल साई संगम शिर्डी यांचे कर्ज खाते 8) मे. मंत्रा प्रिंटर्स, केडगाव शाखा यांचे कर्ज खाते 9) बँकेचे औरंगाबाद शाखेतील सोनेतारण घोटाळा 1 कोटी 21 लाख रुपयांचे बाबत कारवाई व वसुली 10) बँकेचे सिन्नर शाखेतील सोनेतारण घोटाळा रु. 1,45,000/- 11) श्री घृष्णेश्वर मिल्क प्रडक्टस श्रीगोंदा शाखा या कर्जखातेवर झालेली फसवणूक 12) मे. हिंदुस्थान ट्रेडर्स मु. राहाता या कर्ज खात्यात झालेली फसवणूक 13) मे. ब्युटी वर्ल्ड राहाता शाखा या कर्ज प्रकरणात झालेली फसवणूक 14) मे. ए. आर. टेक्नलजिस मुख्य शाखा यांचे कर्ज खात्यात झालेली फसवणूक 15 ) मे. जिजाई मिल्क श्रीगोंदा शाखा या कर्ज खात्यात झालेली फसवणूक 16) बँकेचे चाकण शाखेत झालेला सोनेतारण घोटाळा 17) मे. गंगन बिल्डर्स गुलटेकडी पुणे शाखा या कर्जदाराला बँकेचे नियमांचे उल्लंघन करून दिलेले कर्ज 18) बँकेचे संचालक मंडळाने मु. जेऊर ता. नगर येथे खेरदी केलेली शेतजमीन शेतजमीन खरेदी करण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी नाही तसेच हा व्यवहार संशयास्पद व बेकायदेशीर आहे. 19) यशराज चाईनरी करमाळा शाखा या कर्जदाराला एक वर्ष अगोदर पैसे देऊन नंतर एक वर्षाने सोयीस्कररीत्या ते कर्ज दाखविले होते आता पूर्ण थकबाकीत आहे. 20) मे. टेरासफ्ट टेक्नलजीचे कर्ज खातेत झालेली फसवणूक व संबंधित कर्जदाराचे अहमदनगर मर्चंटस बँकेतील खात्यावर झालेला अंदाजे 100 कोटी रूपयाचा संशयास्पद व्यवहार व उलाढाल 21) बँकेचे संचालक मंडळाने जुलै 2019 मध्ये यशराज वाईनरी करमाळा शाखा या कंपनीला 24 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते ही कंपनीच अस्तित्वात 22) मे. आर. बी. के. कन्स्ट्रक्शन प्रा. लि. पाथर्डी शाखा यांचे कर्ज खाते. 23) मे. मनूराज डेव्हलपर्स जालना शाखा या कर्जदाराला दिले रुपये 4 कोटी 85 लाखांचे फसवणूक कर्ज प्रकरण संबंधित कर्जदाराने हे कर्ज नाकारलेले आहे. 24) बँकेने मे. रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्था या पतसंस्थेला दिलेले दि. 30/03/2019 रोजी दिलेले बनावट व नियमबाह्य सोनेतारण कर्ज व त्या कर्ज खात्याचे व्याजात दिलेली नियमबाह्य सूट 25) बँकेचे संचालक मंडळाने बनावट आर्थिक पत्रके तयार करुन रिझर्व्ह बँकेला सादर केली म्हणून रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला 40 लाख रुपयांचा दंड केला या दंडाची रक्कम संचालक मंडळाकडून वसुल करावी असे ठरले असताना ती वसुली जाणीवपूर्वक करण्यात आलेली नाही. 26) बँकेने साईसुजाता हस्पिटल या थकबाकीतील कर्जदाराला दिलेले  24/07/2019 चे 9,90,000/- चे संशयास्पद कर्ज. 27) बँकेचे तत्कालिन चेअरमन श्री. दिलीप 1गांधी यांचे बचत खातेवर झालेला संशयास्पद व्यवहार व दि. 15/02/2019 रोजी एक लाख रुपयांची 1 रुपयांची नाणी भरल्याचे खोटे रेकर्ड तयार करून केलेला अपहार 28) बँकेचे संचालक श्री. अशोक माधवलाल कटारिया यांची स्वतःची पतसंस्था श्री ढोकेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. ची थकबाकी वसूली करणेसाठी नगर अर्बन बँकेत केलेले 3 नियमबाह्य कर्ज प्रकरणे मे. स्वप्नील इंडस्ट्रीज, निखिल इंडस्ट्रीज, सुरेश इंडस्ट्रीज या नावाने 3 कोटी रुपयांचे कर्ज जे सध्या थकीत आहेत. वरील नमुद नियमबाहय कर्जप्रकरणांतील कर्ज झालेले आहे. केलेल्या काही कर्जप्रकरणांतील गांधी यांचे निकटवर्तीय आशुतोष सतीष लांडगे, सचीन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी व नगर अर्बन बँकेचे मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा अपहार केलेला आहे. हि सर्व प्रकरणे ही गंभीर आहेत. 

रिझर्व्ह बँकेने दि. 15/09/2020 रोजी नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळास दिलेल्या पत्रात व त्यानंतर नगर अर्बन बँकेतील झालेल्या गैरव्यवहारांची निश्चीत रक्कम निष्पन्न होईल. तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य, अर्बन बँकेचे अधिकारी हे बँक व्यवसायी या जबाबदार पदावर कार्यरत असताना त्यांनी सन 2015 ते आजपर्यंत नगर अर्बन मल्टीस्टेट शेडयुल्ड बँकेच्या प्रधान कार्यालयात त्या सर्व 28 कर्जप्रकरणांबाबतचे निर्णय घेण्याकरीता संचालक मंडळाच्या सभा घेवुन व कर्ज प्रकरणे मंजुर केले आहेत. तसेच काही कर्जदार व इतर संबंधीतांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, आर्थिक पत्रके व इतर बनावट कागदपत्रे तयार करून व त्यांचा वापर करून नगर अर्बन बँकेची, माझी व इतर खातेदार, ठेवीदार व सभासदांचे आर्थिक नुकसान करून अंदाजे 100 ते 150 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच रक्कम वेगवेगळ्या खात्यांचा वापर करुन काढुन घेवुन वेगवेगळ्या स्वरुपात वापरली आहे. या सर्व प्रकारांची व भवीष्यात निष्पन्न होणाऱ्या इतर गैरव्यवहारांची दखल घेवुन मला व इतर सभासद, खातेदार व ठेवीदार यांना न्याय मिळणेकरीता माझी नगर अर्बन बँकेचे सन 2014 ते 2019 या कालावधीतील तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य, नगर अर्बन बँकेचे अधिकारी, चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी यांचे निकटवर्तीय आशुतोष सतीष लांडगे, सचीन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी व नगर अर्बन बँकेचे मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत घनशाम बल्लाळ यांच्याविरुध्द फिर्याद आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

 दरम्यान, नगर अर्बन बँकेतील अनेक  कर्ज प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत अर्ज दाखल आहेत. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हे दाखल होतात.  मात्र आता सभासदाच्या फिर्यादीनुसार तब्बल दीडशे कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सत्ताढारी संचालकांसह, अधिकारीही अड्चाणीत आल्याने त्यांचे धाबे द्णाण्ले आहेत. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या