Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रवीण आंधळे यांची अवजड वाहतूक संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड

आंधळे यांच्या निवडीचे औरंगाबाद जिल्ह्यातील वाहतूकदारांकडून जोरदार स्वागत











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी मुंबई :- महाराष्ट्र अवजड वाहतूक संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे युवा नेते प्रवीण आश्रुबा आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. आंधळे यांच्या निवडीचे औरंगाबाद जिल्ह्यातील वाहतूकदारांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कळंबोली पनवेल येथे राज्य संघटनेचा वर्षपूर्ती व अवजड वाहन धारकांचा मेळावा शुक्रवारी ( दि. १८ )रोजी पार पडला. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीहरी मिसाळ यांनी प्रवीण आंधळे यांची औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करून त्यांना निव्युक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आंधळे यांचा राज्याचे परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने, कळंबोलीचे महामार्ग पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, पनवेल वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वासकर, संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीहरी मिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मेळाव्याच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्रीहरी मिसाळ यांनी संघटनेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेऊन आगामी काळात राज्य सरकाचे अवजड वानांबाबत धोरण काय राहील तसेच केंद्र सरकारने घेतलेल्या डिझेल वाहनांच्या स्क्रॅप निर्णयाचा व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती देऊन, त्यावरील उपाययोजना आदीबाबत मार्गदर्शन केले.



यावेळी आंधळे म्हणाले, सर्वच व्यासायिकांच्या संघटना आहेत. तशी अवजड वाहतूकदारांचया संघटनेची गरज आहे. त्यामूळे येणाऱ्या अनेक अडचणीतून  मार्ग काढता येतो. माझ्यावर जो विश्वास दाखवून निवड केली, त्याला औरंगाबाद जिल्ह्यात संघटना आणखी भक्कम करून तो सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली.

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव विश्वास सातपुते, सहसचिव अमोल काटकर, राजेंद्र काळे, खजिनदार किशोर क्षीरसागर, कुलदीप, कुलदीप सिंग वर्दी, चंद्रागणेश कडाली, महेश पाटील, आजिनाथ लटपटे, प्रमोद शिंदे, गोरख यमगर, राजू फुंदे, विठ्ठल सस्ते, प्रदीप सिंग सोहल, सदाशिव भानुसे, बाळू मिसाळ, पांडुरंग खेडकर, गणेश इंगळे, संतोष भाळे, यांच्यासह    मेळाव्यास राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित होते. 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या