Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव-पाथर्डीच्या अतिवृष्टीग्रस्ताना कोकण निकषानुसार मदत मिळावी: आमदार मोनिका राजळे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी: पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टी व पुरग्रस्थांसाठी कोकण व कोल्हापूरच्या निकषानुसार मदत मिळावी अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.

 आमदार मोनिका राजळे यांनी काल मंत्रालयात ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी व नागरिकांचे तसेच विकास कामांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. मनुष्य हानीसह घराची पडझड,पुराचे पाणी घरात शिरून,संसार उपयोगी साहित्य, धान्य, जनावरांचे मृत्यू, पिकांची पुर्णतः हानी,शेतजमिनीचे नुकसान,याच्या विदारक वस्तुस्थिती ची माहिती देऊन या अतिवृष्टी व पूरग्रस्तांना अति तातडीची मदत देऊन पंचनामे झालेल्या व नुकसान झालेल्या बाबींची शासकीय निकषानुसार नुकसान भरपाई न देता कोकण व कोल्हापूर ,सातारा भागासाठी ज्याप्रमाणे विशेष बाब म्हणून अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय झाला.त्याप्रमाणे खास बाब म्हणून पाथर्डी व शेवगाव च्या अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना व पूर पीडितांना भरघोस मदत मिळावी यासाठी आग्रह धरला. 

 पालकमंत्री मुश्रीफ व मदत ,पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून फक्त आढावा न घेता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी अशी विनंती केली. याबाबत सविस्तर माहिती व अहवाल प्राप्त करून घेऊन कोकण व कोल्हापूरच्या धर्तीवर मदत देण्याचे आश्वासन यावेळी मंत्रीमहोदयांनी दिले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी करून  वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त केले जातील, असे सांगून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना सरसकट पंचनामे करण्याचा आदेश पत्राद्वारे दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या