Ticker

6/Breaking/ticker-posts

विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा खरवंडी कासारला फटका ; निम्मे गाव अधांरात

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील महत्वाची व मोठी बाजार पेठ असणाऱ्या खरवंडी कासार ला वायरमनच नाही महालक्ष्मी सारख्या सणासुदीला निम्मे  गाव अधांरात आहे अधीकाऱ्याची उडवा  उडवीची उत्तरे यामध्ये ग्रामस्थ हैराण झाले आहेत. 


खरवंडी कासार गावठाण ह्रददीत विज वितरण कंपनीच्या ट्रॉन्सफार्मरला फ्युज बॉक्स नसल्याने गावातील तारा तुटतात यामुळे जिवीतहाणी होवू शकते त्यामुळे गावठाण हद्दीमधील ट्रॉन्सफार्मरचा विज वितरण कंपनीने फ्युज बॉक्स पॅनल बोर्ड दुरुस्ती करणे गरजेचे आहे  थकीत बिलामुळे अचाणक पणे विज वितरण कंपनी विजपुरवठा बंद करते मग सतत विज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकाना सेवा का देत नाहीत असा प्रश्न ग्रामस्थ करत आहेत खरवंडी कासार गावात लोबंकळलेल्या तारा वाकले पोल नावालाच असणारे रोहित्राचे पॅनल बोर्ड  यामध्ये फ्युज नाहीत सर्व वायर डायरेक जोडलेले आहेत यामुळे रोहित्रा मधुन फ्युज गेली तरी टाकायची म्हणजे वायरमन शिवाय पर्याय नाही केव्हा विज येईल आणि जाईल यांचा नेम नाही त्यामुळे थकीत विज बिलामुळे अचाणक पणे विज पुरवठा बंद करणाऱ्या विज वितरण कंपनी ने आधी विज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

खरवंडी कासार येथिल गावठान ट्रान्सफार्मरची दैननीय अवस्था झाली असुन ट्रान्सफार्मरचे फ्युज बॉक्स निकामी झाले आहेत. यामुळे वारंवार विद्युत प्रवाह खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.विद्युत महामंडळ कर्मचारी घरोघर जाऊन थकित विजबिल वसुली करत आहेत मात्र विद्युत महामंडळ ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करण्यासाठी वितरण कपंनी कडे मटेरीयल नाही . महावितरणच्या आभियंता यांनी खरवंडी कासार गावठान अंतर्गत असणाऱ्या ट्रान्सफार्मरची प्रत्यक्ष पाहणी करूण दुरुस्ती करावी जेणे करुण ट्रान्सफार्मरचे आयुष्य वाढण्यास मदत होइल व महावितरणचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होइल तरी त्वरीत गावठान ट्रान्सफार्मरला फ्युज बॉक्स अद्यावत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 विद्युत वाहक तार तुटुन सुद्धा ट्रान्सफार्मर बंद होत नाही फ्युज बॉक्स नसल्याने विद्युत प्रवाह थेट वाहक तारामध्ये जोडण्यात आला असल्याने जिवीतास धोका निर्माण झाला आहे. हनुमान मंदिर परिसरात विद्युत वाहक तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असुन दत्त मंदिर ते महादेव मंदिर परिसरात विद्युतप्रवाह खंडीत होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.दिवसा प्रवाह खंडीत झाल्यास विद्युत कर्मचारी प्रवाह जोडण्याचे काम करतात मात्र विद्युत तारा रात्रीच तुटुन विद्युत प्रवाह खंडीत होत आहे. व तुटलेल्या तारात विज पुरवठा चालु राहत असल्याने जिवित हाणी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या