Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रेताची हेळसांड केल्या प्रकरणी ३० ते ३५ जनांवर गुन्हा दाखल लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव : शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी जमुन मयताचे प्रेत पोलीस स्टेशन आवारात ठेवून प्रेताची हेळसांड केल्या प्रकरणी अनोळखी ३० ते ३५ जणांवर शेवगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केलाआहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मयत आदित्य अरुण भोंगळे या बालमटाकळीच्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली होती.  पोलीसांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत मयत आदित्य अरुण भोंगळे याचे उत्तरीय तपासणी झालेले प्रेत ॲम्बुलन्स मधून शेवगाव पोलीस स्टेशन आवारात घेऊन येऊन आमची पोलीस स्टेशनच्या चार पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरनामुळेच आमच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप करण्यात आला होता .

दरम्यान या प्रकरणी चार पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करा असा हट्ट धरून विषाणूंचा प्रादुर्भाव होईल हे माहित असताना सुद्धा पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी जमवून  मयताचे प्रेत पोलीस स्टेशन आवारात ठेवून प्रेताची हेळसांड करून विटंबना केली आहे.  आदी कारणावरून पोलीस कॉ. कैलास शंकर राठोड यांच्या फिर्यादीवरून  शेवागाव पोलीस स्टेशनला अज्ञात  ३० ते ३५ जणांवर  भादवि कलम -297,188,269,270 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या