Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत बनावट दाखले बनविणार्याल टोळीवर छापा ; एक ताब्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल



 






पाथर्डी शहरातील नाथनगर मध्ये याच इंमार्तीत बनावट दाखले तयार केले जात होते.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 पाथर्डी : शाळेची बनावट कागदपत्र तयार करून विकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलीटरी इंटेलीजेंस देवळाली कॅम्प नाशीक यांच्या पथकाने संयुक्त रित्या कारवाई करून रंगेहाथ पकडले आहे.पाथर्डी शहरातील नाथनगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे .

 मारुती शिरसाठ व त्याचे काही साथिदार हे शाळा  सोडल्याचे बनावट दाखला कागदपत्र तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहीती  मिळाल्यानंतर  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलीटरी इंटेलीजेंस देवळाली कॅम्प नाशीक यांनी संयुक्त रित्या केलेल्या कार्यवाहीत ४ आरोपी बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून ते देण्याचे काम करत आढळून आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही युवक सरकारी व सैन्यदलात नोकऱ्या हस्तगत करीत असल्याच्या माहिती मिळाल्या वरून ही कारवाई करण्यात आली आहे.

 छापा घातलेल्या ठिकाणी बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज व त्या लागणारे साहित्य मिळून आले. संत भगवानवावा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय अकोला ता.पाथर्डी,संत भगवानवावा कला,विज्ञान व वाणिज्य महा विद्यालय (घाटशिळ पारगांव ता. शिरूर कासार जिल्हा बीड),श्री नागनाथ विद्यालय पिंपळगांव (टप्पा) (ता.पाथर्डी जि.अ.नगर,जि.प.प्राथ.शाळा चिंचपुर इजदे ता.पाथर्डी जि.अ.नगर),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मोहरी ता.पाथर्डी जि.अ.नगर) या विद्यालयाचे दाखले व बनावट शिक्के व साहित्य आढळून आले. याठिकाणी आरोपी मारुती आनंदराव शिरसाट यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता दतु नवनाथ गर्जे (रा.अकोला ता. पाथर्डी)२) कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी ता.पाटोदा जि. बिड) ३) मच्छिंद्र कदम (रा. मानुर ता शिरूर कासार, जि बीड) यांनी संगनमताने एकत्र येवून तयार केल्याचे सांगितले. यापूर्वी आरोपी अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा.वाडीवरे ता इगतपुरी जि नाशिक), शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा पिंपळद ता जि नाशिक) यांना सैन्यदलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला बनवला आहे.

.दिलेल्या दाखल्यामध्ये त्यांचे नाव व जन्म दिनांकामध्ये बदल करून बनावट दाखला दिला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे १) मारुती आनंदराव शिरसाठ ( वय ५२ रा. जांभळी ता पाथर्डी ) २) दत्तु नवनाथ गर्जे (वय ४० रा. अकोला ता. पाथर्डी ) ३) कुंडलिक दगडु जायभाये (रा.अनपटवाडी ता.पाटोदा जि. बीड ) ४) मच्छिंद्र कदम (रा. मानूर ता शिरूर कासार, जि बीड) ५) अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवरे ता इगतपुरी जि नाशिक), ६)शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा.पिंपळद ता.जि.नाशिक )यांनी एकत्र येवून संगणमताने कट करून शासनाची फसवणुक करण्याचे उददेशाने बनावट दस्तऐवज तयार करून तो खरा आहे असा भासवून त्याचा शासकीय कामाकरीता गैरवापर करून सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणुक केल्या बाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात भा.द.वि.क. ४२०, १२०३, ४६७, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या घटनेच्या अधिक तपास करीत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या