*येथिल जुण्या राष्ट्रीय महामार्गावरील पुल पावसाने वाहील्याने अपघाताला निमंत्रण, दुरुस्तीची मागणी
महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता दिलीप तरडे यांनी केली पाहणी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार :खरवंडी कासार गावामधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ (222 ) वरिल पुल पावसामुळे धोकादायक झाला आहे तसेच साईड गटार नसल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे व पुलावर साचत असल्याने तुटलेला पुल जमा झालेल्या पाण्याने दिसत नसल्याने अचानक अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे .
कल्याण विशाखापटनम राष्ट्रीय महामार्ग क्रं ६१ (२२२ ) हा खरवंडी कासार गावातुन जात होता बाजार पेठे मधील गर्दी मुळे या महामार्गावर बायपास रस्ता झाला असला तरी जुण्या रस्त्याने मोठी रहदारी आहे खरवंडी गावात जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे याच रस्त्यावर धोकादायक पुल आहे पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसात ही पुलाहुन पाणी जाते त्यामुळे आरधा रस्ता व पुल वाहुन गेला आहे साईड गटार नसल्याने रस्त्या वरिल सर्व पाणी पुलावर जमा होत आहे जमा झालेल्या पाण्या मुळे तुटलेला पुल जवळ जाऊ पर्यत दिसुन येत नाही त्यामुळे येथे अचाणक अपघात होऊ शकतो
राष्ट्रीय महामार्गा वरिल बायपास मुळे प्रवाशी वाहनधारकाची सोय झाली जुण्या मार्गावरिल रस्ता हा मुत्युचा सापळा बनला आहे बायपास झाल्यापासुन जुण्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही गहीनाथ फाटा ( लोकनेते गोपिनाथ मुंढे चौक ) ते भगवान गड फाटा हा रस्ता अत्यंत खराब होऊन ही त्याकडे लक्ष न दिल्याने वाहनधारका बरोबर ग्रामस्थाची डोकेदुखी झाली आहे गावात असणारी मोठी बाजारपेठ तसेच पाटोदा शिरूर भालगाव गहीनाथ गड टाकळी मानुर या मार्ग येणारे प्रवाशी मार्ग व भगवान गडावर येणारे भावीक तसेच शेजारच्या लगत असलेली वाडी वस्ती येथील सर्व ग्रामस्थ नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो.
गेले तीन चार दिवस झाले मुसळधार पावसामुळे नागरिकाचा जो दळण वळणचा जोडलेला जो रस्ता आहे त्या पुलाची ही अशी दुर्दशा झाली आहे येणार्या जाणार्या लोकांचे खुप हाल होत आहेत अचाणक अपघात होऊन जिवित हानी झाल्यानतंरच सबंधीत विभाग लक्ष देणार का हा प्रश्न आहे .
खरवंडी कासार येथे नवा राष्ट्रीय महामार्ग बायपास झाला असला तरी जुणा मार्ग सार्वजणीक बाधंकाम विभागाकडे वर्ग झालेला नाही सध्या तरी या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेच आहे त्यामुळे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागा कडे खरवंडी कासार ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप पाटील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक दादासाहेब खेडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता दिलीप तरडे यांना माहीती दिली याची दखल घेत तरडे यांनी तातडीने खरवंडी कासार येथील खचलेल्या फुलाची पाहणी करत तातडीने पूल दुरुस्त करण्यासंदर्भात आश्वासन दिले व नवीन पुलाचे इस्टिमेट करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यासाठी सुचवले.
वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हारकाँग्रेस कमिटीचे युवक जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक दादासाहेब खेडकर मालेवाडी ग्रामपंचायत सदस्य महारूद्र कीर्तने उपस्थित होते,
0 टिप्पण्या