लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत: जामखेड मतदार संघामध्ये शनिवारचा दिवस भारतीय
जनता पक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांना हादरा देणारा ठरला, भारतीय जनता पक्षाचे कर्जत
नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक व सक्रिय सदस्य
पदाचा राजीनामा दिला, व राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत पत्रकार परिषदेमध्ये दिले. राऊत यांनी
पक्ष सोडल्यामुळे भारतीय जनता पक्षाला कर्जत व जामखेड तालुक्यात मोठा धक्का बसला
आहे.
राज्याचे
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कालच भाजपाचे अनेक जण महाविकास आघाडीत येणार
असल्याचे संकेत दिले होते आणि त्याच अनुषंगाने 24 तास उलटण्याच्या आत कर्जत जामखेड मतदार संघातील
बडा नेता असलेले नामदेव राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळाला लागले आहेत
त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे मोठे नुकसान होणार असून कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाची ताकद किती तरी पटीने वाढली आहे आगामी होणाऱ्या नगरपंचायतीच्या
निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसून येतील असे मानले जाते.
नामदेव
राऊत मतदार मतदार संघातील बडा नेता
नामदेव
राउत कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत त्यांचे इतर
समाजामध्ये देखील मोठे प्राबल्य आहे. त्यांच्यासोबत सर्व समाजातील कार्यकर्त्यांचा
मोठा संच असून मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा स्वतःचा असा कार्यकर्ता
आहे. केवळ ओबीसी
चेहरा नव्हे तर भविष्यातील आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते , पंचवीस वर्षापासून भाजपचा आमदार निवडून आणण्यात राऊत यांचे मोलाचे योगदान
होते.
याच
प्रमाणे ही कर्जत नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर भाजपचा झेंडा त्यानी फडकाविला होता.
संपूर्ण मतदार संघामध्ये त्यांची स्वतःची एक मोठी व्होट बँक आहे आणि ते सर्व मतदार
ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या सोबत राहतात असा इतिहास आहे. कर्जत
शहरामध्ये सर्वात शक्तिशाली व जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या
जाण्यामुळे भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आगामी काळात समर्थकांत सोबत
चर्चा करून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुहूर्त साधला जाईल असे स्पष्ट
संकेत दिले श्री राऊत यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदार
संघामध्ये व कर्जत शहरात मोठी ताकद वाढली आहे.
0 टिप्पण्या