Ticker

6/Breaking/ticker-posts

ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्षरोपण काळाची गरज- पालवे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 करंजी: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व बळीराजासाठी मुबलक पाऊस होण्यासाठी आणि मोफतच्या ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्षरोपण ही काळाची गरज असून वडाचे झाड सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करते त्यामुळे प्रत्येक गावात वडाचे किमान शंभर झाडांचे वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे यांनी केले.

 पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नियोजित श्रीराम मंदिर उभारण्यात येणाऱ्या टेकडीवर भजनी मंडळ, माजी सैनिक व जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  माजी सैनिक शिवाजीराव पालवे, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, उद्योजक धीरज मैड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब आकोलकर, माजी सैनिक जालिंदर अकोलकर, वैष्णवी महाराज मुखेकर, मच्छिंद्र अकोलकर, नामदेव मुखेकर, माजी सैनिक संभाजी वांढेकर, संतोष मगर, भाऊसाहेब मंचरे, अशोक गरगडे, राजेंद्र अकोलकर, चंद्रकांत आकोलकर, प्रदीप टेमकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, ग्रामसेवक अनिल भाकरे, चंद्रशेखर मोरे,भाऊसाहेब मोरे, सुरज क्षेत्रे, देविदास मुखेकर, अंबादास अकोलकर, किसन दानवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 करंजी येथील श्रीराम टेकडीवर लवकरच प्रभू श्रीरामाचे लोकसहभागातून मंदिर उभारले जाणार असुन लोकसहभागातून ८० हजार रुपये खर्च करून रस्ता देखील बनवण्यात आला आहे. तसेच पं स सदस्य आटकर यांनी स्वखर्चातून राम-लक्ष्मण सीतामाईची मूर्ती दिलेल्या आहेत. हा परिसर धार्मिकस्थळा बरोबरच पर्यटन स्थळ म्हणून  ओळखला जावा त्यादृष्टीने ग्रामस्थांचे प्रयत्न राहणार असल्याची माहिती पत्रकार विलास मुखेकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या