Ticker

6/Breaking/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी जामखेड नगरपालिका स्वबळावर लढवणार- रामभाऊ मरगळे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जामखेड : पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारला पाईक होऊन सर्व वंचीत घटकातील सर्व जाती –जमातीतील मंडळी एकत्र येत जामखेड नगरपरिषेदेवर वंचीत बहुजन आघाडीचा झेंडा  फडकणार असून, वंचीत बहुजन आघाडी ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. असा निर्धार रामभाऊ मरगळे यांनी व्यक्त केला. 

आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांची बैठक वंचीत बहुजन आघाडीचे  नेते अँड.डॉ अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पक्ष निरीक्षक  रामभाऊ मरगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  नुकझाली. 

 रामभाऊ मरगळे यांची पक्ष निरिक्षकपदी निवड झाल्यानंतर जामखेड येथिल शासकीय विश्रामगृहावर पार पड्लेल्या बैठ्कीत जेष्ठ नेते, कार्यकर्ते इच्छुक उमेदवार यांचे आगामी नगरपरिषद निवडणुकी बाबतीत मत मतांतरे जाणून घेण्यात आली. या प्रसंगी वंचीत बहुजन आघाडीचे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समनव्यक अँड. डॉ अरुण जाधव यांनी  रामभाऊ मरगळे यांचे स्वागत केले. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे भटके विमुक्तांचे नेते अँड. डॉ अरुण जाधव, पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे जिल्हाअध्यक्ष (दक्षिण) प्रतीक बारसे, जिल्हा सचिव योगेश साठे,जिल्हा उपाध्यक्ष भीमराव चव्हाण,जेष्ठ सल्लागार जीवन पारधे  यांनी आपले मत व्यक्त केले व सर्वांनी हातात हात मिळवत पक्षादेश पाळण्याचे व अँड. डॉ अरुण जाधव यांच्या  माध्यमातून जामखेड नगर परिषदेच्या २१ जागा स्वबळावर लढवणार आहेत. येणारी नगरपरिषद निवडणूक ही प्रस्थापित पक्षांना नक्कीच धडकी भरवनारी असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी जामखेड शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचीत बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या