Ticker

6/Breaking/ticker-posts

गोकुळ आंधळे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी: महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्याच सेवेसाठी या ब्रीदवाक्याखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून  महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू ठरलेल्या संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष  गोकुळ आंधळे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे.

 दिवंगत दादासाहेब सरदेशमुख यांच्या प्रेरणेने व  सामाजिक कार्यकर्त्या गौरी दादासाहेब सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू महाराज विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने  गोकुळ आंधळे यांना सन्मानित करण्यात आले. संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन  व जनलक्ष्मी ग्रामीण सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर सानप, फाउंडेशनचे सचिव प्रा. गोरक्ष भवर, खजिनदार  बाळासाहेब फड  यांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम संजीवनी भवन येथील कार्यालयात पार पडला. 

 गोकुळ आंधळे यांनी संजीवनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले. सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं .हा पुरस्कार म्हणजे गोकुळ आंधळे यांच्या  कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे, असे प्रतिपादन करत फाउंडेशनचे चेअरमन युवानेते ज्ञानेश्वर सानप यांनी गोकुळ आंधळे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या