Ticker

6/Breaking/ticker-posts

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून पळवून नेऊन मारहाण; गदेवाडीत वृद्धाची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

शेवगाव:  तालुक्यातील गदेवाडी येथे दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून फॉर्चुनर वाहनात पळवून नेऊन मारहाण करून विनायक किसन मडके यांना गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ३ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने  तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

      या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गदेवाडी येथे ८ दिवसापूर्वी  विनायक किसन मडके हे घोड्यावर शेतात जात असताना फॉर्चुनर गाडी क्र/ २२२३ हिने कट मारून दमदाटी व शिवीगाळ केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी  दारू पिण्यास पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून दि ९/९/२०२१ रात्री ९.१५ च्या सुमारास फॉर्चुनर गाडी २२२३ यामध्ये विनायक किसन मडके यांना घातपाताच्या उद्देशाने पळवून नेले. 

गाडीतुन पळवून नेल्यानंतर लाथा बुक्यांनी मारहाण करून छळ करून गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याने तुळशीराम विनायक मडके रा. गदेवाडी यांच्या फिर्यादीवरून मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर, मच्छिंद्र धनवडे, यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पावरा हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या