Ticker

6/Breaking/ticker-posts

जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने करणार; मंत्री शंकरराव गडाखांचा जामखेड- कर्जतला शिवसंवाद

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 जामखेड-कर्जत: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जलसंधारणाच्या कामासाठी जामखेड-कर्जत तालुक्याला प्राधान्यक्रम देणार आहे. त्यामुळे दुष्काळी भाग असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसंवाद बैठकांत बोलताना केले. 

  मंत्री गडाख यांनी काल कर्जत जामखेड मधील विविध भागात दौरे करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. जामखेड येथे शिवसेना  जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद, युवा सेना ता. प्रमुख सावता हजारे, सरपंच प्रशांत शिंदे, सावता ग्रुप चे अध्यक्ष प्रमोद कोल्हे,उपसभापती दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत,युवा नेते किरण वर्पे, पत्रकार दीपक देवमाने, ग्रा.पं सदस्य दयानंद कथले, चेअरमन अंगद मुळे, प्रदीप हजारे, , सुग्रीव कोल्हे,किरण हजारे,युवा नेते राहुल पाटील, सुशील आव्हाड,मोहित पाटील ,उमेश हजारे,डॉक्टर ईश्वर हजारे ,सुभाष रोडे,पांडुरंग शेळके,परमेश्वर कोल्हे, गणेश चव्हाण,मारुती गोरे,सागर हजारे शिवसैनिक ग्रामस्थ दूध उत्पादक उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री गडाख म्हणाले कि, जिरायत भागात जलसंधारणच्या कामामुळे पाण्याची साठवण व दुष्काळ मुक्त होण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.त्यामुळे जामखेड तालुक्यात जलसंधारणाची कामे केल्यास तालुक्यातील दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यात जलसंधारणाच्या कामासाठी प्राधान्यक्रम देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच जवळा परिसरात शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दुध व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहेत. शेतीच्या पाण्याचे कायम स्रोत नसताना देखील येथील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.तसेच दुग्धव्यवसाय बरोबर दुध प्रक्रिया उद्योगासाठी देखील मदत करणार असल्याचे मंत्री गडाख यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी जवळा येथील मुंजेवाडी पाझर तलावाच्या भरावाची दुरुस्ती व तलावातील गाळ काढण्यासाठी  जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी  जवळा गावाचे सरपंच शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले, ग्रामपंचायत सदस्य देवमाने उपस्थित होते. तसेच  नामदार शंकरराव गडाख यांना जवळा येथील नांदनी नदी खोलीकर-रुंदीकरण करण्यात यावे, जवळा येथील नांदणी नदीवर नवीन ८ साखळी बंधारे बांधण्यात यावे या मागणीचे निवेदन युवा सेना ता.प्रमुख सावता हजारे यांच्या वतीने देण्यात आले. शिवसंवाद बैठकिनिमित्त जलसंधारण मंत्री शंकरराव  गडाख  यांना जामखेड युवासेना तालुका प्रमुख सावता हजारे यांच्या स्वराज्य फार्म हाऊसला येथे भेट दिली.

शेतकऱ्यांनी अनुभवला मंत्री गडाख यांचा साधेपणा..

 { मंत्री गडाख हे जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेना युवा तालुका  प्रमुख सावता हजारे यांच्या वस्तीवर शिवसंवाद बैठक आयोजित केली होती. यावेळेस शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री आले असताना त्यांचा कोणताही बडेजावपणा नव्हता. मंत्री गडाख यांनी आपलेपणाने दुधउत्पादक    शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. आज पर्यंत अनेक मंत्री पाहिलेत पण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सारखा साधेपणा अजून पहिला नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.}


कर्जत दौऱ्या मध्ये कोंभळी येथे युवासेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे यांच्या वस्तीवर घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री गडाख उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंवाद व जनसंपर्क करण्याच्या दृष्टीकोनातुन ज्या कल्पना मांडल्या आहेत, त्यामधून या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तुमचे प्रश्न मला सांगा जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाकडे मी वैयक्तिक लक्ष देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करेल.

यावेळी, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, युवासेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे , माजी सरपंच अमृत लिंगडे, शहरप्रमुख बबन दळवी,माजी सरपंच सचिन दरेकर, खांडवीचे सरपंच प्रविण तापकीर, कोंभळीचे सरपंच पती राहुल गांगर्डे, बाळासाहेब निंबोरे, बेलगावचे उपसरपंच वैभव बाबर, मुळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य डॉ सुनील मुळे, अशोक वाघ, दीपक मांडगे, भाऊसाहेब शिंदे, हरी बाबर, राजेंद्र घोडके, गुलाब बाबर, शिवाजी वायसे, आयुब शेख,स्वप्नील शहाणे, मुन्ना शेख, माजी सरपंच विठ्ठल गांगर्डे, चेअरमन मारुती गांगर्डे , ग्रामपंचायत सदस्य मारुती उदमले, जेष्ठ नागरिक बाळासाहेब गांगर्डे, धनराज गांगर्डे, उद्योजक तुषार गांगर्डेअशोक गांगर्डे, उद्योजक राहुल गांगर्डे, नितीन उदमले, प्रवीण गांगर्डे, राजू सुद्रीक, प्रकाश पठारे,सुधीर बचाटे, अमोल लगड, प्रदीप तापकीर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 तालुक्यातील चिंचोली रमजान येथे युवासेनेचे शाखेचे उदघाटन मंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आले आले. यावेळी शाखाप्रमुख किरण ननवरे, उपशाखाप्रमुख साजिद बोबडे, साजिद शेख , बाळू वायसे , मोहन गारुडकर, दत्तात्रय तरटे आदींसह शिवसैनिक , चिंचोली रमजान येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या