Ticker

6/Breaking/ticker-posts

पूर परिस्थिती आढावा बैठक: नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल पाठ्विण्याच्या आमदार राजळे यांच्या अधिकार्याना सूचना

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी -शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थिती संदर्भात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील सर्व खात्यांच्या आधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली .त्याप्रसंगी आमदार राजळे यांनी  पूरग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित पंचनामे करून  शासनाकडे अहवाल पाठवावा अशा सुचना केल्या .गेल्या  दहा ते बारा दिवसां पाणी पुरवठा होत असलेल्या जायकवाडी पाणी पुरवठा योजनेचे पाणी पूर परिस्थितीमुळे बंद असल्यामुळे संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून या योजनेच्या ठिकाणी त्वरित टँकर पाणीपुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामा बद्दल संबंधित अधिकाऱ्यांना ही राजळे यांनी चांगलेच खडसावले. 

याप्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, जि प सदस्य राहुल राजळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड ,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपाध्यक्ष माणिक खेडकर ,पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे ,पाथर्डीच्या गटविकास अधिकारी शितल खिडे, शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके,पाथर्डी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, शेवगावचे कृषी अधिकारी गणेश वाघ,विज महामंडळाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, शेवगावचे डॉक्टर चारुदत्त असलकर, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे आदी उपस्थित होते. 

बारा दिवसापासून पाथर्डी व शेवगाव शहराला पाणी नाही. नगरपालिका प्रशासनाने पाण्याची काय व्यवस्था केली टँकरसाठी कोणाच्या परवानगीची वाट पाहता आता लोकांचा अंत पाहू नका काहीही करा पण तात्काळ टँकर सुरू करा.अनेक गावेे अंधारात आहेत.जलसाठे खराब झाल्याने व वीज नसल्याने प्यायला पाणी नाही.वीज कर्मचारी लोकांचे फोन उचलत नाही. अनेक तक्रारी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा. 

 

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये सरसकट पंचनामे करा, नुकसान भरपाई पासून कुणीही वंचित राहता कामा नये.महामार्गाच्या चुकीच्या कामामुळेेे शहरातील दुकाणे पाण्यात गेली. त्यांच्या नुकसानभरपाईची व्यवस्था करा. लोकांचे जीव जाण्याची वाट पाहू नका खड्डे बुजवा अशा तीव्र शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

  आमदार राजळे यांनी शहराच्या पाणी प्रश्नावरून पाथर्डीच्या मुख्याधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. पुरांची गावे टार्गेट करा व लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करा अशा सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या कामा बाबतही राजळे यांनी संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. नागमोडी  गटारी बांधल्यात. दिवसागणिक माणूस बदलतो. गटारी करताय की रस्ता हेच कळायला तयार नाही .महामार्गाचे काम बारा महिन्यात करा किंवा बारा वर्षात करा पहिले खड्डे बुजवा, लोकांचे जीव जाण्याची वाट पाहू नका, तुमच्या चुकांमुळे शहरातील दुकानात पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले. त्यांच्या नुकसानभरपाईची व्यवस्था करा. संबंधित यंत्रणेवर पोलीस केस करायची का ?असा सवाल उपअभियंता दिलीप तायडे यांना विचारला.फक्त नदीकाठचे पंचनामे न करता सरसकट पंचनामे करा. पूर परिस्थितीमुळे शेकडो लोकांच्या घरात पाणी गेले आहे. लोकांना प्रशासनाकडून  सहकार्याची अपेक्षा आहे. शेकडो घरे पाण्यात वाहून गेले. पूर परिस्थितीमुळे विशेष बाब म्हणून अतिरिक्त घरकुलाची नवीन यादी पाठवा, गाळामुळे अनेक विहिरी बुजल्या आहेत एमआरईजीएस मधून नवीन विहिरीचे व दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवा.

अनेक कुटुंबांची घरे पाण्यात आहेत. त्यांना तातडीने पत्र्याचे शेड किंवा रोख रक्कम देण्याची व्यवस्था व्हायला हवी. 80 टक्के रस्ते व बंधारे खराब झाले आहेत त्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे त्याचा अहवाल शासनाला पाठवा व पाठपुराव्यासाठी माझ्याकडे एक प्रत द्या, पूरग्रस्त गावांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे आरोग्य विभागाने यासाठी दक्ष राहून उपाय योजना करावी अशा सूचना राजळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या