लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: करोनामुळे पती गमावलेल्या राज्यातील २० हजार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा
म्हणून. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने २७ ऑगस्ट २०२१ रोजी 'वात्सल्य समितीचा' जीआर प्रसिद्ध केला. त्याला आता एक महिना उलटला तरीही ही समिती कागदावरच असून काम काज सुरू झालेले नाही. तर लालफितीत अडकल्याने २० हजार विधवा महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
'वात्सल्य समिती ही विधवा महिलांसाठी विविध योजना
राबवन्यासाठी स्थापन करायची आहे. त्यामार्फत या महिलांना विविध कागदपत्रे व
योजना तालुकास्तरावर राबवायच्या आहेत. ' महाराष्ट्र करोना
एकल महिला पुनर्वसन समिती'च्या वतीने कार्यकर्त्यांनी
शंभरपेक्षा जास्त तालुक्यात तहसीलदारांना जीआर प्रसिद्ध होताच निवेदने दिली. समिती
स्थापन करण्याची विनंती केली. अनेकदा जाऊन तहसीलदार यांना पाठपुरावा केला मात्र
खूप कमी ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती यासाठी
पुढाकार घेतलेले हेरंब कुलकर्णी यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
यासासाठी बैठक घेतली होती. त्यांच्या आदेशानंतर जीआर निघाला. मात्र, त्यापुढील कार्यवाही रखडली आहे. महिला बालकल्याण समितीच्या सचिवांकडे
पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र महिना उलटला तरी समित्या स्थापन होऊ
शकल्या नाहीत. आधीच सरकारने निर्णय घेण्यास उशीर केला आहे. त्यात या समित्या
स्थापन केव्हा होणार, त्यांच्या
बैठका, शिफारशी आणि प्रत्यक्ष मदत मिळण्यास किती वेळ लागणार
हे आता सांगता येत नाही.
त्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा याच्या
पाठपुराव्यासाठी मोहीम राबविली. राज्यभरातून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
आणि संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून या समित्या तातडीने स्थापन करण्याची मागणी
करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला बैठक घेण्याचा वार आणि वेळ नक्की करण्याचे
आदेशही द्यावेत. दर महिन्याला या बैठकांचा आपण आढावा घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. आता तरी संबंधीत मंत्रालय, अधिकारी अंमलबजावनी करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
0 टिप्पण्या