Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना: केंद्राने दिले ५० हजार, तर राज्याने ५ लाख द्यायला काय हरकत ?

 










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगरः 'करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला केंद्र सरकार जर ५० हजार रुपयांची मदत करणार असेल तर राज्यातील आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे?' असा सवाल भाजचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पा. पुढे म्हणाले ,लसीकरणासाठी आमचा चेक तयार आहे, असे राज्य सरकारने सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने मोफत लस उपलब्ध करून दिल्याने हे पैसे वाचले आहेत. त्याचा उपयोग करून राज्य सरकराने ही मदत तातडीने द्यावी,' अशी मागणीही त्यांनी केली.

विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटात देशभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात केलेल्या मदतीचा उल्लेख करून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. विखे पाटील म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यामातून ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यामुळे आतापर्यंत देशातील ८५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होवू शकले. राज्य सरकार मात्र फक्त आमचा चेक तयार असल्याच्या वल्गना करीत बसले. त्यामुळे लसीकरणाचे वाचलेले सर्व पैसे राज्य सरकारने सामान्य माणसांच्या मदतीसाठी वापरण्याची आवश्यकता आहे. करोना संकटात मंत्री मुंबईत बसून राहिले. मात्र आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी जीवावर उदार होवून काम करीत होते.

 नगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री एकही कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. त्या उलट प्रवरा कोविड सेंटर, डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना मोठी मदत होवू शकली,' असेही विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात राज्य सरकार लसीकरणाठी पुढाकार घेत असल्याचे जाहीर केले होते. एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यांच्या लसीच्या खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. 

१८ ते ४४ वयोगटातील राज्यातभरात सुमारे सहा कोटी लोक आहेत. त्यांच्यासाठी बारा कोटी डोसचे पैसे सरकार एकरकमी भरण्यास तयार आहे, मात्र लस उपलब्ध करून द्या, असे त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारनेच ही मोहीम हाती घेऊन सर्वांना मोफत लस देण्यास सुरवात केली. तो धागा पकडून विखे पाटील यांनी ही मागणी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या