Ticker

6/Breaking/ticker-posts

अहिल्यानगर राज्यात सर्वाधिक थंड..!


अहिल्यानगर राज्यात सर्वाधिक थंड..! 

दिवसाही कुडकुडी,पारा ७.५ अंशावर 












लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहिल्यानगर- उत्तर भारतातून दक्षिणेकडे थंडगार वारे वाहू लागले असून यामध्ये वेगाने वाढ झाली आहे त्याचा परिणाम राज्यभरातील अनेक शहरांचे तापमान घसरण्यात झाला आहे सर्वाधिक तापमानाचा पारा हा अहिल्यानगर मध्ये ७.५ अंशावर खाली घसरला आहे त्यामुळे अहिल्यानगरला  थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा फील आला आहे .


गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे नोंदल्या गेलेल्या तापमानात सर्वात कमी तापमान हे अहिल्यानगर जिल्ह्याचे नोंदले गेले आहे मुंबईत किमान तापमान १५ तर माथेरानचे १७ अंश नोंदले गेले महाबळेश्वर ११ अंशावर स्थिर आहे तर अहिल्यानगर राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे ६.६ अंशावर पसरले आहे त्यामुळे रात्री सकाळी आणि दिवसभराही थंडीची कुरकुरीत उभारली आहे गेल्या पाच-सहा वर्षापासून अहिल्यानगरच्या तापमानात सातत्याने घट होत आहे 


प्रत्येक वर्षी अनेक वेळा राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत आणि विशेषतः थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या माथेरान आणि महाबळेश्वर पेक्षाही तापमानाचा पारा निच्चयांकी नोंदला जातोय. निसर्ग ऋतुच्या चक्रामध्ये चारही ऋतूंना तेवढेच महत्त्व आहे तथापि अपमानाचा पारा अहिल्यानगरचाच अलीकडील काही वर्षात कमी नोंदला जातोय परिणामी नगरकरांना महाबळेश्वरचा फील जाणवत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या