Ticker

6/Breaking/ticker-posts

बाप्पा पावला : राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 श्रीगोदा: महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांचे मध्यस्थीने अखेर मार्गी लागला असुन कामगारांना दि. १.४.२०१९ पासुन १२ टक्के पगारवाढ देण्यास मंजूरी आली आहे या बाबत राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांचे अध्यक्षतेखालील बैठक या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला अशी माहिती  त्रिपक्षीय समितीचे सदस्य राजेंद्र नागवडे यांनी दिली.

 महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा २०१४ मध्ये झालेला करार दि. ३१.३.२०१९ रोजी संपुष्टात आलेला होता. त्यामुळे दि. १.४.२०१९ पासुन नवीन करार करुन साखर कामगारांच्या पगारवाढीची मागणी कामगार युनियने केलेली होती. त्यानुसार यावर योग्य तोडगा काढून शिफारस करणे करीता राज्य शासनाने मालक प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी अशी राज्यस्तरीय त्रिपक्षीय समिती स्थापन करुन सदर समितीस पगारवाढी संदर्भात शिफारस करणेची सुचना दिलेली होती.

   गेली सहा महिने समितीच्या बैठका होत होत्या परंतु निर्णय होत नव्हता. शेवटी हा निर्णय माजी शरद पवार यांचे  मध्यस्थी झाला करुन साखर कामगारांना दि. १.४.२०१९ पासुन १२ टक्के पगारवाढ देणे व इतर मागण्या मान्य करण्यात आल्या .

 बैठकीस साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, , कल्लप्पा आवाडे, चंद्रदीप नरके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, कामगार युनियनचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, आनंदराव वायकर ,  कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, सदस्य सचिव कल्याण आयुक्त रविराज इळवे, साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रकाश आवाडे, राजेंद्र नागवडे, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन(इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ.सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ.आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, डी. डी वाकचौरे, योगेश हंबीर आदी उपस्थित होते.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या