Ticker

6/Breaking/ticker-posts

भविष्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी- किशोर मरकड

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 अहमदनगर: पर्यटन व्यवसाय हा आघाडीवरील व्यवसाय होता मात्र कोव्हिडं मुळे गेली दीड वर्षापासून या व्यवसायाला  उतरती कळा लागली आहे मात्र आता देशातील पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे या पुढील काळात मात्र भविष्यात हा व्यवसाय अधिक तेजीत येईल असा विश्वास अहमदनगर टुरिझम फोरमचे अध्यक्ष व चैतन्य ट्रॅव्हल चे संचालक किशोर मरकड यांनी व्यक्त केला.

 

 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अहमदनगर या महाविद्यालयाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातील भविष्यातील वाटचाल या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या वर्षी युनायटेड नेशन च्या व टुरिझम ऑर्गनायझेशन जागतिक पर्यटन दिनानिमित् इन्कलुजीव टुरिझम फॉर ऑल ही संकल्पना पर्यटन विकासासाठी मांडलेली आहे. जगभरामध्ये विविध कार्यक्रम करून पर्यटनास वृद्धिंगत करण्यासाठी हा दिवस साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यानुसार महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले त्यामध्ये पोस्टर पेंटिंग स्पर्धा, सेल्फि ऑफ लोकल टुरिस्ट स्पॉट ,प्रश्न मंजुषा, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते.

 

 ते पुढे म्हणाले की पर्यटन व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की जो व्यवसाय एकाचवेळी अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक जण यामध्ये जोडली जातात, त्यामुळे सर्व जग हे पर्यटनाकडे विशेष लक्ष देत आहे काही देशांमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे ते देश आपल्या पर्यटकांसाठी दरवर्षी वेगळं काही देण्याचा प्रयत्न करत असतात हॉटेल मॅनेजमेंट मध्ये खूप मोठी संधी तरुणांना आहे कारण जेवढे पर्यटक व प्रवासी वाढतील तेवढी गरज ही हॉटेलची राहणार आहे एक मोठे हॉटेल एक लघुउद्योग कारखाना एवढे रोजगार देऊ शकतात मात्र हे क्षेत्र हे उत्तम सेवा देणार असल्याने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. असेही त्यानी सांगितले. यावेळी डॉ. नंदकुमार जगताप प्राचार्य योगिता सत्रे ,प्रा. बाळासाहेब शेंडगे ,प्रा. रचना खटावकर ,प्रा. गोकुळ सोनवणे, प्रा. वहीत मणियार, प्रा. अनुभव वाजपेयी, प्रा. सागर माळवदे प्रा. प्राची चव्हाण व विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित होते .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या