Ticker

6/Breaking/ticker-posts

मोबाईल ‘रेंज’साठी चढावे लागते झाडावर ; नागरिक हैराण

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केला जात असला तरी नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील धावडेवाडी, चौधर वाडी, आनंदमळा ग्रामस्थांना  मोबाईल कंपनीचे एकही  रेंज नसल्याने  चक्क झाडावर चढून फोन करावा लागत आहे . त्यामुळे नागरिक हैराण झाले असून , मोबाईल टॉवर उभारून गावातील नेटवर्कची समस्या दूर करावी अशी मागणी  उपसरपंच संतोष भापकर यांनी खा .डॉ . सुजय विखे यांना पत्राद्वरे केली  आहे .

 

गावाची जवळपास सहा हजार लोकसंख्या आहे. बहुतांशी नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही भागात  कोणत्याच मोबाईल कंपनीच्या टॉवरची व्यवस्था कंपनीकडून केली गेली नाही.नेटवर्कची शोधाशोध करून फोन लावण्याची वेळ अनेकदा वस्ती लगतच्या  झाडावर जाऊन तरुणांना नेटवर्कची शोधाशोध करून फोन लावण्याची वेळ येते. केंद्र सरकारकडून डिजिटल शिकवणीसाठी डिजिटल शाळा केल्या जातात. त्यासोबतच विविध क्षेत्रात ही यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, या गावात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने गुंडेगाव डिजीटलपासून हे गाव वंचित राहिले आहे. 

 

मागील अनेक महिन्यापासून गावात मोबाईल टॉवर उभारून ग्राहकांची गैरसोय टाळावी, ही मागणी पुढे येते आहे . मात्र, त्याची दखल कंपन्यांकडून घेण्यात आली नाही. परिणामी अनेक मोबाईलधारकांना शेतात जाऊन किंवा उंच ठिकाणावर मोबाईलसाठी नेटवर्क शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र आहे. टॉवरअभावी मोबाईलधारकांना गैरसोयींन सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे . मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क उपलब्धीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांना उंच ठिकाणाहून मोबाईलचा वापर करावा लागत असल्याने त्यांच्यातून संतापाची लाट पसरली आहे. 

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या